शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात चिंंच घोटाळा निविदा काढण्यापूर्वीच ठेका : उपअभियंता, लेखापाल अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:09 IST

सटाणा : कधी निकृष्ट दर्जाची रस्ताकामे, तर कधी कागदावरच डागडुजी अशा गैरकारभारामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली सटाणा बांधकाम विभागाची यंत्रणा आता चिंच बहार घोटाळ्यात अडकली आहे.

ठळक मुद्देउपअभियंत्यासह लेखापाल अडचणीत आले घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी

सटाणा : कधी निकृष्ट दर्जाची रस्ताकामे, तर कधी कागदावरच डागडुजी अशा गैरकारभारामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली सटाणा बांधकाम विभागाची यंत्रणा आता चिंच बहार घोटाळ्यात अडकली आहे. सटाणा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील चिंचेच्या झाडांवरील फळ बहार उतरवल्यानंतर चिंच फळ बहार काढण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्याने उपअभियंत्यासह लेखापाल अडचणीत आले आहेत. या चिंच फळ बहार घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील प्रकाशा- छडवेल-विंचूर रस्ता किलोमीटर ११०/०० ते १४८/२००, अहवा-ताहाराबाद-नामपूर रस्ता किलोमीटर ३१/२०० ते ८५/००, मालेगाव-सटाणा रस्ता किलोमीटर ४१/२०० ते ६१/५३५, साक्री-नामपूर-मालेगाव रस्ता किलोमीटर १६३/७०० ते १६९/९०० या रस्त्यांच्या दुतर्र्फा असलेली चिंचेची झाडे आणि नामपूर, ताहाराबाद विश्रामगृह व सार्वजनिक बांधकाम विभाग स्टोअर सटाणा येथील आवारामधील चिंचेची दोनशेहून अधिक झाडांवरील फळ बहार काढण्यासाठी दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात निविदा काढण्यात येते. या झाडांना मोठ्या प्रमाणात बहार येत असल्यामुळे तो उतरविण्यासाठी व्यापाºयांमध्ये चढाओढ असते. यंदा मात्र तब्बल दोन महिने उशिराने निविदा तर प्रसिद्ध केलीच; परंतु त्यापूर्वीच या झाडांवरील फळ बहार काढण्याचा ठेका आपल्या मर्जीतल्या ठेकेदाराला दिल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून या ठेकेदाराचे चिंच फळ काढण्याचे काम सुरू असताना संबंधित विभागाने मात्र ४ एप्रिलला निविदा प्रसिद्ध करून १० एप्रिलला लिलाव ठेवला आहे.परस्पर लावली जाते विल्हेवाट ..सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या या चिंच फळातून दरवर्षी लाखो रु पयांची उलाढाल होते. यापूर्वी उपअभियंता, लेखापाल आणि ठेकेदार यांच्या संगनमताने लिलाव प्रक्रि या पूर्ण केली जात होती. जास्तीत जास्त लोकांपर्यंत निविदा पोहोचावी म्हणून शासन नियमानुसार शासकीय निविदा प्रसिद्ध करताना त्याची जिल्हा दैनिकात प्रसिद्धी करणे बंधनकारक आहे. मात्र या त्रिकुटाने अन्य ठेकेदारांना निविदेची निर्धारित वेळेत माहिती मिळू नये म्हणून मालेगावमधील एका सायंदैनिकात व साप्ताहिकामध्ये निविदा प्रसिद्ध करून चिंच फळ बहारची परस्पर विल्हेवाट लावल्याचे उघडकीस आले आहे.