शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये संततधार : पहाटेपासून पावसाला सुरूवात उपनगरीय भागांमध्ये सकाळी वाढला जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 14:21 IST

आज पहाटेपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात मागील आठवड्याप्रमाणे सुरूवात झाली आहे. ग्रामिण भागामध्ये मुसळधार तर शहरी भागात संततधार पाऊस सुरू झाला आहे.

ठळक मुद्देपावसामुळे गोदाकाठावर सकाळपासून शुकशुकाट सध्या दीड हजार क्युसेक पाणी नदीपात्रात धरणातून प्रवाहित नाशिकमध्ये पहाटे सुरू झालेल्या पावसाने सकाळी जोर धरला. बहुसंख रस्त्यांची पावसामुळे दैनावस्था झाली

नाशिक : आज पहाटेपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात मागील आठवड्याप्रमाणे सुरूवात झाली आहे. ग्रामिण भागामध्ये मुसळधार तर शहरी भागात संततधार पाऊस सुरू झाला आहे. नाशिकमध्ये पहाटे सुरू झालेल्या पावसाने सकाळी जोर धरला. शहरात संततधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडविली. रविवार असल्यामुळे शाळा-महाविद्यालयांसह शासकिय तसेच बहुतांश खासगी कार्यालयांना सुटी असल्यामुळे विद्यार्थी व चाकरमान्यांचे हाल झाले नाही; मात्र खासगी शिकवणीसाठी बाहेर पडलेल्या तरुण-तरुणींची पावसामुळे गैरसोय झाली. संततधार पावसाने उपनगरांसह शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांवरही पाणी साचले होते. गटारींची अवस्था अद्यापही बिकट असल्यामुळे नाशिकच्या रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसून रस्त्यावर तलाव साचत असल्याचे चित्र आहे. बहुसंख रस्त्यांची पावसामुळे दैनावस्था झाली असून कच पसरली आहे. तसेच रस्त्यांना खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पुणे महामार्गावर नेहरुनगर, उपनगर, गांधीनगर, आंबेडकरनगर, बोधलेनगर या परिसरात खड्डयांमुळे चाळण झाली आहे. महामार्ग असूनही रस्त्यावरील खड्डे बुजविले जात नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच वडाळागाव, अशोका मार्ग, जुने नाशिक, सिडको, इंदिरानगर या भागात देखील रस्त्यांची दुर्दशा कायम आहे.गंगापूर धरणातून विसर्ग सुरूशहरासह ग्रामिण भागातही पावसाचा जोर वाढल्यामुळे गंगापूर धरणातूनदेखील विसर्ग वाढविण्यात आला आहे. शनिवारी दिवसभर साडेपाचशे क्युसेकने विसर्ग सुरू होता. पहाटेनंतर अडीचशे क्युसेकने वाढ झाली .आज दुपारी बारा वाजेपर्यंत ७८६ क्युसेक विसर्ग सुरू होता; मात्र पावसाचा जोर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढल्यामुळे विसर्ग आठशे क्युसेकने वाढविण्यात आला असून सध्या दीड हजार क्युसेक पाणी नदीपात्रात धरणातून प्रवाहित करण्यात आले आहे. धरणातून जरी दीड हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असलातरी शहरात होणाºया पावसामुळे रस्त्यांवरुन वाहून जाणारे व नाल्यामधील पाण्यामुळे गोदावरीच्या पातळीत रामकुंडापासून पुढे अधिक वाढ झाली आहे. अहल्यादेवी होळकर पूलाखालून सुमारे दोन ते अडीच हजार क्युसेक पाणी पुढे रामकुंडात प्रवाहित आहे.

गोदाकाठावर शुकशुकाट...पावसामुळे गोदाकाठावर सकाळपासून शुकशुकाट पहावयास मिळत आहे. येथील बहुतांश विक्रेत्यांनी व्यवसाय बंद ठेवला आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाचा विसर्ग वाढीची शक्यता लक्षात घेत व्यावसायिकांनी सतर्कता बाळगली आहे.