शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

जिल्ह्यात संततधार सुरूच

By admin | Updated: August 8, 2015 23:29 IST

दुबार पेरण्या टळणार : १३४ मिमी पावसाची नोंद

नाशिक : पूर्व भागात दडी मारलेल्या पावसाने गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र कमी-अधिक स्वरूपात का होईना हजेरी लावल्याने या भागातील खरिपाच्या दुबार पेरण्यांवरील संकट टळल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत १३४.५ मिलिमीटर पावसाची नोेंद करण्यात आली आहे.दोेन दिवसांपासून काहीशी उघडीप घेतलेल्या पावसाने काल (दि.८) सकाळपासूनच हलक्या व मध्यम स्वरूपात हजेरी लावली. दुपारपर्यंत पाऊस अधून-मधून सुरूच होता. नाशिक शहरासह जिल्ह्यातही पावसाने चांगली हजेरी लावल्याने बळीराजापुढील संकट काहीसे दूर झाल्याचे चित्र आहे. तरीही अद्याप जिल्ह्यातील पूर्व भागात दमदार पावसाची अपेक्षा आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत तालुकानिहाय झालेल्या पावसाची मिलिमीटरमध्ये आकडेवारी अशी- नाशिक - ४.६, इगतपुरी-२७, दिंडोरी-१२, पेठ-१३, त्र्यंबकेश्वर-७, मालेगाव-१५, नांदगाव-२.८, चांदवड-७.६, कळवण-८.८, बागलाण-८.३, सुरगाणा-९.४, देवळा- ७, निफाड-३, सिन्नर-२, येवला-७ अशी एकूण १३४. ५ मिलिमीटर पावसाची जिल्ह्णात नोेंद करण्यात आली आहे. पश्चिम पट्ट्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली असून, पूर्व भागातील येवला, नांदगाव, मालेगाव व सिन्नर या तालुक्यांतील काही गावांमध्ये दोन दिवसांपासून पावसाने तुरळक स्वरूपात का होईना हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळण्याची शक्यता आहे. काल शनिवारी शहर व जिल्ह्णात पावसाची रिपरिप सुरूच होती. दिवसभर अधून-मधून हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडत होत्या. (प्रतिनिधी)