शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिश राजवटीपासून इंग्रजी साहित्याचे अनुकरण सुरू

By admin | Updated: February 15, 2015 01:01 IST

ब्रिटिश राजवटीपासून इंग्रजी साहित्याचे अनुकरण सुरू

नाशिक : मराठी साहित्याचा पाया असणाऱ्या संत साहित्याला ब्रिटिश काळापासून वाईट दिवस आले. तत्पूर्वी ज्ञानदेवांपासून ते निळूबारायांपर्यंत सर्वच संतांनी जगण्याविषयीचे तत्त्वज्ञान सोप्या भाषेत मांडले होते. ते घराघरात पोहोचले होते, परंतु ब्रिटिश राजवटीपासून इंग्रजी साहित्याचे अनुकरण सुरू झाल्याने संतसाहित्याची पीछेहाट झाल्याचे मत ८८व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नाशिक जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी नीलिमा पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, लक्ष्मीचंद्र शेंडे, मविप्र संस्थेचे अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे, सभापती नितीन ठाकरे, केशव पाटील, त्र्यंबक गायकवाड आदि उपस्थित होते. ते म्हणाले संतसाहित्य मराठी साहित्याचा पाया आहे. वर्तमानकाळाचा अभ्यास करून अध्यात्माद्वारे त्यावर मार्गदर्शन करण्याचे काम संतांनी केले. राज्याची संस्कृती व्यापक आहे, तिची जडणघडणही संतांनीच केली. संतांनी त्यांच्या काळात साहित्यातून वर्तमानकाळातील परिस्थितीवर प्रहार केले. संत निवृत्तिनाथांपासून ते निळोबारायांपर्यंत सर्वांनीच साहित्य घराघरांत पोहोचविले. १३व्या शतकात स्थापन झालेल्या भागवत धर्माने जाती पाती तोडत नव्या धर्माची स्थापना केली. त्यात अनेक पंथांच्या आणि धर्माच्या लोकांनी त्यात प्रवेश केला. त्यानंतर भेदभावाची तीव्रता कमी झाली होती, संतसाहित्याच्या विचारांची ती क्रांती होती. त्यानंतर पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याचा विस्तार झाल्यानंतर संतसाहित्यावर आधारितच लावण्या तयार होऊ लागल्या. तोपर्यंत संतसाहित्य घराघरात होते. परंतु त्यानंतर इंगजांबरोबर आलेल्या त्यांच्या साहित्याचे अनुकरण मराठी साहित्यात होऊ लागल्याने तेव्हापासूनच संतसाहित्याकडे दुर्लक्ष झाल्याचे मत डॉ. मोरे यांनी व्यक्त केले. त्यानंतरही स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाची आरती, प्रार्थना समाजाची तत्त्वे यांच्यामध्येही संतसाहित्याचाच वारसा दिसून आला. त्यामुळे महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येकावर संतसाहित्याचेच संस्कार होत असतात, असे माझे मत असल्याचेही ते म्हणाले. मी संतसाहित्याबरोबरच आधुनिक साहित्याचाही लेखक आहे. त्यामुळे संतसाहित्यिकाच्या दृष्टीतून आधुनिक पद्धतीचे लिखाण करताना मी दोन्हीकडे समतोल साधतो असेही ते म्हणाले. प्रारंभी दामोदर गावले यांनी प्रास्तविक केले. त्यानंतर प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी परिचय करून दिला. वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त मारुतीबुवा कुऱ्हेकर, कार्यक्रमाच्या अध्यक्ष नीलिमा पवार यांनी मनोगत व्यक्त केले. विनायकदादा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)