शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

वणी परिसरात दूषित पाणीपुरवठा

By admin | Updated: August 21, 2014 00:20 IST

आरोग्याची समस्या : विषाणूजन्य रुग्णांची संख्या चिंताजनक

वणी : दूषित पाणी व अस्वच्छतेमुळे साथीचे आजार बळावले असून, हिवताप, अतिसार, कावीळ, विषमज्वर व विषाणूजन्य रुग्णसंख्येची एप्रिल ते जुलै महिन्याची आकडेवारी चिंताजनक आहे. एप्रिल ते जुलै २०१४ या चार महिन्यांत हिवताप-४, अतिसार-१४३, कावीळ-८, विषमज्वर-७१, विषाणूजन्य आजार -१५५ ही रुग्णांची अधिकृत आकडेवारी वणी ग्रामीण रुग्णालयातील असून, याव्यतिरिक्त अनेक खासगी रुग्णालयांत अशाच आजाराचे रुग्ण उपचार घेत असल्याचे बोलले जात आहे. हे सर्व आजार दूषित पाणी व परिसर अस्वच्छतेमुळे होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. प्रत्यक्षात एका वैद्यकीय अधिकाऱ्यालाही डेंग्यू झाला होता.पंचवीस हजार लोकवस्ती असलेल्या वणी शहराच्या पाणीपुरवठा योजनेची स्थिती अशी ओझरखेड धरणालगतच्या विहिरीतून सुमारे सहा किलोमीटर अंतरातून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजनेच्या फिल्टर हाऊसमध्ये पाणी सोडण्यात येते. एका तासात २० हजार लिटर पाणी शुद्ध करण्यात येते. जलशुद्धी केंद्रातून हे पाणी पंपहाऊसमध्ये येते. या पंपहाऊसची क्षमता ७० हजार लिटर इतकी आहे. येथून दोन लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभात पाणी जमा होते ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते.तद्नंतर पिंपळगाव रस्त्यावरील दोन लाख लिटर, टोकाडीपाडा येथील एक लाख ५० हजार लिटर, बोरीचा पाडा येथील ५० हजार लिटर, शिलपाडा ५० हजार लिटर व इतर जलकुंभाद्वारे वणी शहरात पाणीपुरवठा करण्यात येतो.स्वच्छ व शुद्ध पाण्यासाठी टीसीएल, तुरटी आदिंचा वापर करण्यात येतो तसेच जलशुद्धीकरण केंद्रात राजस्थान येथून आणलेली रेती साठविण्यात येते. १५ टन इतकी क्षमता या केंद्राची आहे. पाणीशुद्धी करणासाठी अडीच वर्षांनी ही रेती बदलणे आवश्यक आहे. आत असणाऱ्या रेतीला अडीच वर्षाचा कालावधी झाला आहे. ग्रामपालिकेने दुसरी रेती मागविली आहे. मात्र मनुष्यबळाअभावी हे काम लांबणीवर पडले आहे. दरम्यान, डासांची उत्पत्तीस्थाने दूषित पाणीपुरवठ्याची माहिती ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिल्याचे पांडाणे अधिकारी डॉ. आहिरे यांनी सांगितले.