प्रभाग क्रमांक ६ मध्ये सप्तरंग सोसायटीमागील परिसर येत असून या भागात गेल्या काही महिन्यांपासून नळाला अत्यंत दूषित दुर्गंधीयुक्त पिण्याचे पाणी येत आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांना विविध आजार उद्भवण्याची शक्यता आहे. परिसरात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याबाबत मनपा पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली आहे. संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने नेले आहे, मात्र अद्याप दूषित पाणीपुरवठाप्रश्न मार्गी लागलेला नाही. परिसरात ड्रेनेजलाइन फुटली असावी किंवा पाण्याची लाइन फुटून त्यात सांडपाणी मिसळले जात असल्याने नागरिकांना दूषित दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. परिसरात मनपा पाणीपुरवठा विभागाने त्वरित लक्ष केंद्रित करून शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सप्तरंग परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडून होत आहे.
सप्तरंग सोसायटी परिसरात दूषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST