नाशिक : द्वारका सर्कलजवळ उतरणाऱ्या उड्डाणपुलावरून खाली येणाऱ्या इंधनाच्या टँकरने सुमारे चार वाहनांना पाठीमागून धडक दिल्याने एका चारचाकी वाहनाचे प्रचंड नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी (दि़२५) सायंकाळच्या सुमारास घडली़ दरम्यान, या अपघाताच्या घटनेमुळे द्वारका सर्कलवर सुमारे दीड तास वाहतूक कोंडी झाली होती़ दरम्यान, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलीस उशिरा दाखल झाल्यामुळे कोंडीत भर पडल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे़
कंटेनरची वाहनांना धडक
By admin | Updated: December 25, 2015 23:20 IST