शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

तयार फराळाकडे वाढतोय ग्राहकांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:35 IST

पारंपरिक सणांमध्ये प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीचे स्थान महत्त्वाचे असल्याने या सणासुदीच्या घरगुती फराळापासून विविध प्रकारच्या मिठार्इंची घरात रेलचेल असते. परंतु, सध्याच्या काळात बहुतेक महिला आपला कामधंदा सांभाळून घरही सांभाळत असल्याने घरच्या घरी गोडधोड बनवणे साºयांनाच जमते, असे नाही. त्यामुळे फराळ आणि मिठाईचे बरेचसे पदार्थ बाहेरूनच खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढतो आहे.

नाशिक : पारंपरिक सणांमध्ये प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीचे स्थान महत्त्वाचे असल्याने या सणासुदीच्या घरगुती फराळापासून विविध प्रकारच्या मिठार्इंची घरात रेलचेल असते. परंतु, सध्याच्या काळात बहुतेक महिला आपला कामधंदा सांभाळून घरही सांभाळत असल्याने घरच्या घरी गोडधोड बनवणे साºयांनाच जमते, असे नाही. त्यामुळे फराळ आणि मिठाईचे बरेचसे पदार्थ बाहेरूनच खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढतो आहे. ही संधी साधून विविध बचतगटांनी फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी नियोजन सुरू केले असून, मिठाईवाल्यांनीही सणासुदीसाठी वेगवेगळ्या मिठाई बनविण्याचे काम सुरू केले आहे.  ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा’ असा लौकिक असलेला दीपोत्सवाचा झगमगाट आणि गोडधोडाचे फराळ, नवनवीन वस्तू, कपडे आणि आनंदाच्या आठवणी अशी पारंपरिक व्याख्या बनलेली आहे. परंतु सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्वच कुटुंबातील महिलांना घरगुती गोडधोड बनवायला वेळ मिळत नाही. परंतु, दिवाळ सणातील गोडवा कमी होऊ नये म्हणून बदलत्या काळानुसार घराघरांमध्ये बाहेरून दिवाळीचा फराळ करवून घेण्याची पद्धत रूढ होत असताना शहरातील विविध मिठाईच्या दुकानदारांनीही मिठाईसोबतच दिवाळीचा फराळही विक्रीसाठी ठेवण्यास सुरुवात केली आहे.  मिठाई विक्रेते दिवाळीचा फराळ वेगवेगळ्या बचतगटांकडून आॅर्डर देऊन मागवत आहेत. तर काही बचतगट थेट ग्राहकांशी संवाद साधून आॅर्डर मिळवत आहेत. सध्या बाजारपेठेत नवरात्रीच्या प्रसादासाठी व देवीच्या पूजेसाठी लागणारी मिठाई व फराळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, यावर्षी जीएसटीच्या प्रभावाने विविध पदार्थांचे भाव वाढणार असल्याने मिठाईवाले मागणीच्या प्रमाणातच मिठाई तयार करण्याचे नियोजन करीत आहेत.दसरा- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या मिठाईला मागणी वाढली आहे. सणासुदीच्या दिवसात मिक्स मिठाईला अधिक मागणी असते. त्याचप्रमाणे पेढे, लाडू, काजू- कतली, वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फीलाही मागणी वाढली आहे.  - अजिज शेख,  व्यवस्थापक, हाजी मिठाईबचतगटाला दरवर्षी ८० ते ९० किलो वेगवेगळ्या प्रकारचे फराळ तयार करण्याच्या आॅर्डर्स मिळतात. या आॅर्डर्सला दसºयापासूनच सुरुवात होत त्यापार्श्वभूमीवर नियोजन बैठक घेऊन नियोजन करण्यात येते.- मनीषा पवार, अध्यक्ष,  रचना शिल्प बचतगटपारंपरिक ग्राहकांकडून दरवर्षीप्रमाणे मिठाई आणि ठराविक फराळांच्या पदार्थांची चौकशी सुरू झाली आहे. परंतु सध्या अनेक सोसायट्यांमधून महाराज मिठाई बनवून देण्याचे काम करीत असल्याने तसेच विविध पदार्थांवर जीएसटीही लागून असल्याने दरवर्षीपेक्षा यावर्षी मागणीत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.- मोहन चौधरी, संचालक, सागर सम्राट