सटाणा : बांधकामाचे प्लॅस्टर सुरू असताना २५ फुटांवरून जमिनीवर कोसळून एका मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बागलाण तालुक्यातील केरसाणे येथे मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. झुंबरसिंग गोबा पवार रा. कौतिकपाडे असे या मजुराचे नाव आहे.कौतिकपाडे येथील बांधकाम ठेकेदार किरण पवार यांनी केरसाणे येथे एका बंगल्याचे काम घेतले होते. किरण पवार यांच्यासोबत मजुरीसाठी झुंबरसिंग पवार नेहमीप्रमाणे आले होते. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता प्लॅस्टर करण्याचे काम सुरू असताना झुंबरसिंग पवार यांचा तोल गेल्याने २५ फुटावरून ते खाली कोसळले. डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सटाणा ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.
२५ फुटावरून पडून बांधकाम मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 01:42 IST