शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम साहित्य पुरवठादाराची फसवणूक ४६ लाखांना गंडविले : पैसे न देता खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 01:05 IST

नाशिक : महात्मानगर येथील बिल्डिंग मटेरियल सप्लायरकडून बांधकाम साहित्याची खरेदी करून पैसे न देता कल्याणच्या तिघा संशयितांनी सुमारे ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे़ वृषभ रमेश दुबे, दीनानाथ पांडे व रितेश दुबे (रा़प्लॉट नंबर १०४, मातृभूमी अपार्टमेंट, मोहाने रोड शहर, ताक़ल्याण, जि़ठाणे) अशी फसवणुकीतील संशयितांची नावे असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्देबांधकाम साहित्य पुरवठादाराची फसवणूक वृषभ रमेश दुबे, दीनानाथ पांडे व रितेश दुबे अशी फसवणुकीतील संशयितांची नावे

नाशिक : महात्मानगर येथील बिल्डिंग मटेरियल सप्लायरकडून बांधकाम साहित्याची खरेदी करून पैसे न देता कल्याणच्या तिघा संशयितांनी सुमारे ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे़ वृषभ रमेश दुबे, दीनानाथ पांडे व रितेश दुबे (रा़प्लॉट नंबर १०४, मातृभूमी अपार्टमेंट, मोहाने रोड शहर, ताक़ल्याण, जि़ठाणे) अशी फसवणुकीतील संशयितांची नावे असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महात्मानगर येथील कपिल शरद वाघ (राफ़्लॅट नंबर ७, हरी मंगल अपार्टमेंट) यांचे मखमलाबाद नाक्यावरील गोल्ड क्वाइन अपार्टमेंटमध्ये बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सचे दुकान आहे़ २७ एप्रिल २०१६ ते १९ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत कल्याणमधील संशयित दुबे व पांडे यांनी वाघ यांच्याकडून बांधकामासाठी लागणाºया फ्लाय अ‍ॅशपासून निर्मित विटा अर्थात एएसी ब्लॉक जॉईटिंग अधेसिव (मोआर्टर) व इतर साहित्य विकत घेतले़ सुरुवातीस बांधकामाचे साहित्य विकत घेताना थोड्या-थोड्या रकमा देऊन संशयितांनी वाघ यांचा विश्वास संपादन केला़ त्यानंतर बºयाच वेळा पैसे न देता विश्वासावर ४५ लाख ८५ हजार ९४६ रुपयांचा माल खरेदी केला़मटेरियल सप्लायर वाघ यांनी संशयितांकडे मालाचे पैसे मागितले असता ते टाळाटाळ करू लागले़ अखेर पैसे मिळत नसल्याने वाघ यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पांडे व दुबे यांच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली़ पंचवटी पोलिसांनी याप्रकरणी संशयित रमेश दुबे, रितेश दुबे व दीनानाथ पांडे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.