शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

बीओटीच्या रस्त्यावर बांधकाम विभागाचा खर्च

By admin | Updated: March 26, 2017 22:39 IST

सटाणा : सोग्रस ते दहीवेल राज्यमार्गाची दुरुस्तीची जबाबदारी टोलकंपनीवर असताना साइडपट्टीच्या कामासाठी चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच खर्च केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला.

सटाणा : सोग्रस ते दहीवेल या राज्यमार्गाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी टोलकंपनीवर असताना ताहाराबाद-दसवेल रोडवरील साइडपट्टीच्या कामासाठी चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच पन्नास ते साठ लाख रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. बांधकाम विभागाच्या या निधीचा घोटाळा झाल्याचे बोलले जात आहे.  या कामासंदर्भात सटाणा बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र मंत्री यांनी गंभीर तक्रार केली होती. या संदर्भात बांधकाम विभागाच्या अभियंत्याशी संपर्क साधला असता हे काम चालू दुरुस्तीच्या निधीमधून करण्यात येत असून, सध्या निधी उपलब्ध नसल्यामुळे काम ठप्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे काम करणारी एजन्सी ही टोल कंपनीच असल्याचे त्यांनी सांगितले. साइडपट्ट्या नसल्यामुळे अपघात होत असताना दुसरीकडे बीओटीच्या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असताना त्या रस्त्यावर सीआरची (चालू दुरुस्ती )कामे करून निधीचा अपहार केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. सोग्रस ते दहीवेल हा रस्ता सन २००६मध्ये बीओटी तत्त्वावर बांधून भाबडबारी व पिंपळनेर नजीक टोल वसुली केली जात आहे. त्यामुळे या रस्त्याची देखभाल दुरु स्तीची जबाबदारी देखील संबंधित टोल कंपनीची आहे. मांगीतुंगी चौफुली विकसित करण्याच्या नावाखाली मांगीतुंगी फाटा ते दसवेल रस्त्याच्या दुतर्फा साइडपट्ट्या विकसित करून रस्ता रु ंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चालू दुरु स्तीच्या निधीमधून मंजूर करण्यात आले आहे. सुमारे पन्नास ते साठ लाख रु पये खर्चाचे हे काम चक्क संबंधित टोल कंपनीला देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.