नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत त्यांच्या ताहाराबाद गटातील रस्त्यांची जी कामे हाती घेण्यात आलेली आहेत. ती अतिशय निकृष्ट दर्ज्याची असल्याची तक्रार बांधकाम समितीच्या बैठकीत सदस्य डॉ. प्रशांत सोनवणे यांनी केल्यानंतर या कामाचंी सखोल चौकशी करण्याचे आदेश बांधकाम व अर्थ समिती सभापती तथा उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी दिले. प्रकाश वडजे यांच्या उपस्थितीत बांधकाम व अर्थ समितीची बैठक झाली. बैठकीत राष्ट्रीय महामार्ग क्रं. ५० ते माळेगावा (ता.सिन्नर) रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे हे काम माळेगाव औद्योगिक महामंडळाकडून पूर्ण करून घेण्याकामी ना हरकत दाखला घेण्याबाबत सभेत मान्यता देण्यात आली. तसेच शिरवाडे वणी ते गोरठाण वावी रस्ता कि.मी.०० ते २ कि.मी. खडीकरण व डांबरीकरण करण्याच्या ३० लाखांच्या अंदाजपत्रकीय रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
सटाणा तालुक्यातील कामांची चौकशी होणार बांधकाम समिती बैठक : प्रकाश वडजेंचे आदेश
By admin | Updated: November 18, 2014 00:38 IST