शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुरोगामी लोकशाही आघाडी गठित

By admin | Updated: January 22, 2017 00:46 IST

१२२ जागा लढविणार : कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे अद्याप भिजत घोंगडे

नाशिक : भाजपा-शिवसेनाचा पर्याय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीचे भिजत घोंगडे कायम असताना दहा संघटनांनी एकत्र येत पुरोगामी लोकशाही आघाडी स्थापन केली आहे. सर्व १२२ जागा लढविण्याची घोषणाही या आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.  प्रस्थापित राजकीय पक्षांनी व्यावसायिक राजकारणाचा घोळ क रत समाजाची लूट केली. या लुटीपासून नाशिकचा बचाव करण्यासाठी गुन्हेगारी व भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी स्वच्छ प्रशासन नाशिककरांना देण्याकरिता पुरोगामी लोकशाही आघाडी निवडणुकीमध्ये सर्व जागा लढविणार असल्याची घोषणा मुख्य समन्वयक डॉ. संजय अपरांती यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी (दि.२) केली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पुरोगामी विचारांच्या संघटना एकत्र आल्या आहेत. लोकशाही आघाडीचा कोणताही उमेदवार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा राहणार नाही. स्वच्छ चारित्र्य व सुशिक्षित उमेदवार जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर एआयएमआएएमचे जिल्हा निरीक्षक पंडितराव बोर्डे, बीआरएसपीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र जगताप, रिपाइं सेक्युलरचे विजय बागुल, आवामी विकास पार्टीचे शहराध्यक्ष सरफराज पठाण, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजिज पठाण, संभाजी ब्रिगेडचे योगेश निसाळ, एपीआयचे राज्य सरचिटणीस कैलास पगारे, बहुजन भीम सेनेचे संजय खरात आदि उपस्थित होते. वरील सर्व संघटनांचे नेतृत्व करणारे राष्ट्रीय नेतेदेखील प्रचार सभांना उपस्थित राहून जनतेपुढे भूमिका मांडणार असल्याचे अपरांती यांनी यावेळी स्पष्ट केले. आघाडीमध्ये एकू ण दहा संघटनांचा समावेश आहे.सर्व प्रस्थापित पक्ष व त्यांच्या लोकप्रतिनिधींनी नाशिककरांना अद्याप धोकाच दिला आहे. नाशिकचा तसा बघितला तर सर्वांगीन विकास साधण्यामध्ये या लोकप्रतिनिधींना कुठलेही यश आल्याचे दिसून येत नाही. नाशिक महापालिकेत भ्रष्टाचार होत असून, ठेकेदार पोसण्याचे काम लोकप्रतिनिधींनी केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.