शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ठाकूर समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:06 IST

अनुसूचित ठाकू र जमातीचे जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र वितरणात विलंब करून ठाकूर समाजातील खऱ्या लाभार्थींना आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्याचे राजकीय षडयंत्र रचले जात असून, पडताळणी समित्याच आदिवासी विभागामार्फत हे षडयंत्र करत असल्याचा गंभीर आरोप ठाकूर समाजाच्या प्रतिनिधींनी समाजाच्या राज्यस्तरीय महामेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आला  आहे.

नाशिक : अनुसूचित ठाकू र जमातीचे जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र वितरणात विलंब करून ठाकूर समाजातील खऱ्या लाभार्थींना आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्याचे राजकीय षडयंत्र रचले जात असून, पडताळणी समित्याच आदिवासी विभागामार्फत हे षडयंत्र करत असल्याचा गंभीर आरोप ठाकूर समाजाच्या प्रतिनिधींनी समाजाच्या राज्यस्तरीय महामेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आला  आहे.त्याचप्रमाणे अनुसूचित ठाकूर जमातीच्या जातवैधता प्रमाणपत्रांची प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढावी अन्यथा समाजातर्फे रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही अखिल महाराष्ट्र राज्य अनुसूचित ठाकूर जमातीच्या महामेळाव्याच्या माध्यमातून देण्यात आला आहे.मुंबई नाका येथील तुपसाखरे लॉन्स येथे अखिल महाराष्ट्र राज्य अनुसूचित ठाकूर जमातीच्या महामेळाव्यात समाजाच्या विविध मागण्यांसह जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यात येणाºया अडचणींविषयी चिंतन करण्यात आले. माजी न्यायाधीश चंद्रकांत सैंदानी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि.२) झालेल्या महामेळाव्यात व्यासपीठावर प्रमुख वक्ते रणजित शिंदे यांच्यासह दिलीप देवरे, कैलास देवरे, संतोष ठाकूर, दीपक चव्हाण, यशवंत बागुल, पी. एस. अहिरे आदी उपस्थित होते. समाजातील शिक्षण, नोकरी, राजकारण अशा विविध कारणांसाठी आवश्यक असलेल्या जातवैधता प्रमाणपत्रांचे सुमारे पाच ते सहा हजार प्रस्ताव प्रलंबित आहेत. हे प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्यात यावे, तसेच कुटुंबातील अथवा रक्ताच्या नात्यातील जातवैधता प्रमाणपत्र असल्यास संबंधित अर्जदारास तत्काळ जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी जात पडताळणी समित्यांनी न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही या महामेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आली. त्यासाठी समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करण्यासोबतच आवश्यकता भासल्यास रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा ठरावही या महामेळाव्यात करण्यात आला. प्रास्ताविक बंडू पवार यांनी केले.समाजाची हजारो प्रकरणे प्रलंबितमहाराष्ट्रातील ४७ जमाती अनुसूचित जमातीत वर्गीकृ त करण्यात आल्या असून मात्र यातील ठराविक जमातींना राजकीय दबावाखाली महाराष्ट्रातील आठही समित्यांकडून अन्यायाची वागणूक मिळत आहे. समिती अधिकारी मनमानी पद्धतीने सूडबुद्धीने ज्या जमातींना त्रास देत आहे. त्यात ठाकूर जमातीचा समावेश आहे. सर्व पुरावे असूनही ठाकूर समाजाची हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच ज्यांना निकाल दिला जातो तो अन्याय कारक, मुद्दाम विरोधात दिला जात आहे. असे विविध आरोपही ठाकूर समाजाच्या विविध प्रतिनिधींनी महामेळाव्याच्या माध्यमातून केले. ठाकूर समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.