शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ध्वजावतरणाने सिंहस्थाची सांगता

By admin | Updated: August 12, 2016 00:05 IST

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या चैतन्यदायी सिंहस्थ पर्वाची आज ध्वजावतरणाने सांगता झाली.

ऑनलाइन लोकमतनाशिक/त्र्यंबकेश्वर, दि. 11 - गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या चैतन्यदायी सिंहस्थ पर्वाची आज ध्वजावतरणाने सांगता झाली. रात्री ९ वाजून ३१ मिनिटांनी गुरूने सिंह राशीतून कन्या राशित प्रवेश करताच नाशिकच्या रामकुंडावर तसेच त्र्यंबकच्या कुशावर्त तिर्थावर ध्वजावतरण करण्यात आले. यावेळी ‘हर हर महादेव’ आणि ‘सियावर रामचंद्र की जय’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. गुरुवारी (दि. ११) रात्री ९.३१ वाजता गुरुचा सिंह राशीत प्रवेश झाल्यावर त्र्यबंकेश्वर येथे भाजपा अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास व रोजगार हमीमंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री साध्वी निरंजना ज्योती, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार महेश गिरी यांच्यासह विविध साधू-महंतांच्या उपस्थितीत तर नाशकात रामकुंडावर पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, आमदार बाळासाहेब सानप, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्यासह निर्मोही आखाड्याचे महंत राजेंद्रदास महाराज, निर्वाणी आखाड्याचे श्रीमहंत धरमदास महाराज, दिगंबर आखाड्याचे श्रीमहंत रामकिशोरदास महाराज आदींच्या उपस्थितीत ध्वजावतरण करण्यात आले. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी प्रास्तावीक केले. रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गंगेची आरती करण्यात आली.