शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी भिल्ल समाजाची दफनभूमी वाचवा कॉँग्रेसचा ठिय्या : तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 18:42 IST

सिन्नर : आदिवासी भिल्ल समाजाच्या दफनभूमीवर अतिक्रमणे होत असून समाजाची दफनभूमी वाचविण्यासाठी प्रशासाने गांभीर्याने लक्ष घालावे या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार व मुख्याधिकाºयांना निवेदन देण्यात आले.

सिन्नर : आदिवासी भिल्ल समाजाच्या दफनभूमीवर अतिक्रमणे होत असून समाजाची दफनभूमी वाचविण्यासाठी प्रशासाने गांभीर्याने लक्ष घालावे या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार व मुख्याधिकाºयांना निवेदन देण्यात आले.काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शरद शिंदे, राजकिरण नाईक, जानकाबाई नाईक, शिल्पा नाईक, संगीता मोरे, किसन हांडगे, किशोर कुंवर यांनी या ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. संगमनेर नाक्यावरील हिंदू, मुस्लीम व भिल्ल समाजाची स्मशानभूमी आहे. आदिवासी भिल्ल समाजातील काहीजण अग्निडाग देतात तर गरीब कुटुंबातील काहीजण दफनविधी करतात. मात्र या जमिनीवर अतिक्र मणे होत असल्याची तक्रार कॉँग्रेसच्यावतीने तहसीलदार व मुख्याधिकाºयांना दिलेल्या निवेदनात केली आहे.शहर व तालुक्यात आदिवासींच्या जमिनी धनदांडगे बळजबरीने हिसकावून घेत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. आदिवासींना शासनाकडून मिळालेल्या जमिनी काही बिल्डर विसार पावती व साठेखत करारनामा करुन जमिनीचे बेकायदा व्यवहार करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सहा-सात वर्षे उलटून व्यवहार पूर्ण करत नाही. आदिवासींची अडवणूक केली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला.शरद शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली ठिय्या आंदोलन केल्यानंतर नगरपरिषदेतील अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर तहसीलदार गवळी यांची भेट घेऊन मागण्या मांडण्यात आल्या.

टॅग्स :Strikeसंप