शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भूमी अधिग्रहण विधेयकास काँग्रेसचा विरोध निरर्थक

By admin | Updated: May 15, 2015 23:54 IST

केंद्रीय मंत्री सुदर्शन भगत यांची टीका

नाशिक : भूमी अधिग्रहण विधेयकास विरोधकांकडून विशेषत: काँग्रेसकडून होत असलेला विरोध पूर्णपणे निरर्थक असून, केवळ उद्योगपतींचे हित जोपासण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी केला. नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. भगत पुढे म्हणाले की, भूमी अधिग्रहण विधेयक हे पूर्णत: शेतकरी हिताचे आहे. ग्रामीण भागाचा विकास करताना त्याठिकाणी, रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य, दळण-वळण या सुविधा उपलब्ध करण्यासाठी भूमि अधिग्रहण करावेच लागेल. याचा अर्थ शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने या जमिनी घेतल्या जाणार नसून त्याकरिता मापदंड ठरविण्यात आला आहे. शेतकऱ्यांना चारपटीने याचा मोबदला दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या दिवसापासून शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. देशातील शेतकरी जगला तरच विकास साध्य होईल, याकरिता शेतकऱ्यांचे हात बळकट करण्याचा सरकारचा पहिल्यापासून अजेंडा आहे. त्यादृष्टीनेच हे विधेयक तयार करण्यात आले असून, शेतकऱ्यांना याचा फायदाच होईल; मात्र काँग्रेस या विधेयकावरून राजकारण करीत असून, उद्योगपतींना एकप्रकारे मदत करीत आहे. काँग्रेस शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करीत असून, विधेयक मंजूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल, असेही भगत यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)