शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेसच्या सर्वाधिक महिला सदस्य

By admin | Updated: May 27, 2017 23:51 IST

नाशिक : महिलांना ५० टक्के आरक्षणाच्या नियमानुसार एकूण ८४ सदस्य असलेल्या मालेगाव महानगरपालिकेत ४२ महिला सदस्य निवडून आल्या असून, त्यातही भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसने आघाडी घेतली आहे.

संजय दुनबळे। लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महिलांना ५० टक्के आरक्षणाच्या नियमानुसार एकूण ८४ सदस्य असलेल्या मालेगाव महानगरपालिकेत ४२ महिला सदस्य निवडून आल्या असून, त्यातही भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसने आघाडी घेतली आहे. कॉँग्रेसच्या २८ सदस्यांपैकी तब्बल १४ महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. विशेष म्हणजे विजयी महिलांमध्ये सर्वात कमी मते घेऊन विजयश्री प्राप्त करणारी महिलाही कॉँग्रेसचीच आहे. मालेगाव महानगरपालिकेची चौथी पंचवार्षिक निवडणूक अटीतटीची झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण असल्यामुळे ४२ महिलांनी या निवडणुकीच्या माध्यमातून मालेगाव महापालिकेत प्रवेश केला आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी महिलांनी उमेदवारी दिली. त्यापैकी भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसच्या सर्वाधिक (१४) महिलांना विजय मिळाला आहे. कॉँग्रेसशिवाय इतर कोणत्याही राजकीय पक्षांना विजयी महिला उमेदवारांची दुहेरी संख्या गाठता आली नाही. राष्ट्रवादी कॉँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी ९, तर जनता दल आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येकी तीन महिलांनी विजय मिळविला आहे. मालेगाव महानगरपालिकेत नव्यानेच प्रवेश करणाऱ्या एमआयएम या पक्षाच्या पहिल्याच प्रयत्नात चार महिला विजयी झाल्या आहेत. सर्वाधिक मते मिळवून विजयी होण्याचा मान राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रभाग १५ मधील उमेदवार सबीहा मुजम्मील बफाती (९३८३) यांनी मिळविला आहे. विजयी होणाऱ्या महिलांमध्ये सर्वात कमी मते मिळवून विजयी होण्याचा विक्रम भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसच्या प्रभाग २ मधील उमेदवार हमीदा शेख जब्बार (२२४२) यांच्या नावे नोंदला गेला आहे. याच प्रभागातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार छाया दीपक शिंदे यांना २९४८ इतकी मते मिळालेली आहेत. महापालिकेत सर्वात कमी जागा जनता दलाला (६) मिळाल्या आहेत. या पक्षाच्या निवडून आलेल्या ६ उमेदवारांमध्ये ३ महिला उमेदवारांचा समावेश आहे. या पक्षाच्या प्रभाग १५ मधील उमेदवार शान-ए-हिंद निहाल अहमद (९०९५) यांना विजयी महिला उमेदवारांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.  महापालिकेच्या कारभारात सुधारणा करून आपल्या प्रभागात अधिकाधिक विकासकामे करण्याबरोबरच संपूर्ण शहराचा चेहरामोहरा बदलण्याची जबाबदारी निवडून आलेल्या महिला पार पाडतील, अशी सर्वसामान्य मालेगावकरांची अपेक्षा आहे.