नाशिक : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ शहर कॉँग्रेसने मंगळवारी शहरातून सायकल मोर्चा काढत दुचाकीची अंत्ययात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेली. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून दरवाढ मागे घ्यावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. सकाळी कॉँग्रेस भवनापासून निघालेला मोर्चा महात्मा गांधीरोडने धुमाळ पॉर्इंट, मेनरोड, शिवाजीरोड, शालिमारमार्गे मध्यवर्ती बसस्थानक चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी हातात विविध घोषणा लिहिलेले फलक घेतले होते. त्यात ‘बढती महंगाई, घटती कमाई’, ‘मोदीजी के विदेश मे, पकोडे बेचो देश मे’, ‘कमाई कम, महंगाई जादा’ अशा लक्षवेधी घोषणांनी जनतेचे लक्ष वेधून घेतले. वैकुंठ रथात दुचाकीची अंत्ययात्रा बहुतांशी मोर्चेकरी सायकल घेऊन सहभागी झाले होते, त्याचबरोबर वैकुंठ धाम वाहनात दुचाकी ठेवून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती.
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कॉँग्रेसचा सायकल मोर्चा दुचाकीची अंत्ययात्रा : सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:30 IST
नाशिक : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ शहर कॉँग्रेसने मंगळवारी शहरातून सायकल मोर्चा काढत दुचाकीची अंत्ययात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेली.
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कॉँग्रेसचा सायकल मोर्चा दुचाकीची अंत्ययात्रा : सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा
ठळक मुद्देसरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी कॉँग्रेस भवनापासून निघाला मोर्चा