शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेसनिष्ठेची ऐशीतैशी, छाजेड यांचे पुत्र शिवसेनेत

By admin | Updated: February 17, 2017 00:19 IST

कॉँग्रेसनिष्ठेची ऐशीतैशी, छाजेड यांचे पुत्र शिवसेनेत

नाशिक : कॉँग्रेसचे निष्ठावान घराणे म्हणविणाऱ्या माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचे पुत्र तथा पक्षाचे माजी पदाधिकारी प्रितीश छाजेड यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गुरुवारी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या वेळी हा प्रवेश सोहळा पार पडला.जयप्रकाश छाजेड हे कॉँग्रेसचे निष्ठावान मानले जातात. त्यांचे वडील जितमल छाजेडही कॉँग्रेसचे निष्ठावान म्हणून परिचित होते. जयप्रकाश छाजेड यांनी नाशिक शहर कॉँग्रेसबरोबरच प्रदेश कॉँग्रेसवरही अनेक पदे भूषविली आहेत.१९८५ मध्ये त्यांनी कॉँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढविली त्यात ते पराभूत झाले. त्यानंतर त्यांना अनेक वर्षे सत्तापदापासून वंचित राहावे लागले होते. विलासराव देशमुख यांच्याशी त्यांची जवळीक होती. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली. सध्या ते इंटकचे प्रदेशाध्यक्षपद भूषवित आहेत. त्यांचे सुपुत्र अ‍ॅड. आकाश छाजेड यांनी एनएसयूआयच्या अध्यक्षपदापासून सुरुवात केल्यानंतर नगरसेवकपद य पक्षाचे शहराध्यक्ष पदही भूषविले, तर जयप्रकाश छाजेड यांच्या पत्नी शोभा छाजेड यांनी नगरसेवकपद आणि उपमहापौरपद भूषविले होते. प्रितीश छाजेड यांच्याकडे तसे कॉँग्रेसचे कोणतेही थेट पद नव्हते किंबहुना ते कॉँग्रेसमध्ये सक्रिय नव्हते. तथापि, त्यांच्या अचानक शिवसेनेच्या व्यासपीठावर अवतीर्ण होण्याने साऱ्यांनाच आश्चर्य वाटले आणि अखेरीस उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधल्याने हीच का तुमची कॉँग्रेसनिष्ठा म्हणून पक्षातच चर्चा सुरू झाली आहे.