शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकला काँग्रेसचा मेळावा

By admin | Updated: August 28, 2016 22:54 IST

सरपंच, उपसरपंचांसह सदस्यांचा सत्कार

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर येथील संत जनार्दनस्वामी आश्रमातील हॉलमध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये ४/५ ग्रामपंचायती वगळता ४७ ग्रामपंचायतींचे सर्व सदस्य, उपसरपंच व सरपंच यांचा सत्कार करण्यात आला. ‘मोदीमुक्त भारत’ हे अभियान देशभर राबविण्यात येणार असून, या अभियानाचा प्रारंभ त्र्यंबकेश्वर या शहरातून आजपासून करीत असल्याचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी आपल्या भाषणात सांगितले. देशात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. जवळपास २० मंत्री भ्रष्टाचाराने माखलेले आहेत. लोकांना खोटी आश्वासने व भूलथापा देऊन हा पक्ष सत्तेवर आला. जनतेचा भ्रमनिरास झाला आहे, असा टोलाही त्यांनी मोदी टीमला लगावला. कार्यक्रमाचे आयोजन त्र्यंबक तालुक्याच्या आमदार निर्मला गावित यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार निर्मला गावित होत्या. जि. प. सदस्य निर्मला गिते, पंचायत समिती सभापती मंगळूतात्या निंबोरे, उपसभापती शांताराम मुळाणे, सुनंदा भोये, योगीता मौले, पालिका सदस्य तथा माजी नगराध्यक्ष ललित लोहगावकर, रवींद्र गमे, विष्णुपंत बेंडकोळी, कचरू पा. डुकरे, पांडुरंगमामा शिंदे, जिल्हा सरचिटणीस प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, देवीदास जाधव, भिवा राजू महाले, कैलास चव्हाण, दिलीप मुळाणे, पुरुषोत्तम लोहगावकर, दिनेश पाटील, सुमनताई टोपले, सीताबाई खरपडे, मंदाताई वाचाळ, योगेश चोथे, मोहन भांबरे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपतराव सकाळे यांनी केले. यावेळी भाषणातून आमदार गावित, देवीदास जाधव, कचरू पाटील डुकरे, भिवा राजू, कैलास चव्हाण, पुरुषोत्तम लोहगावकर, विष्णुपंत बेंडकुळी, मंगळू निंभारे आदिंनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले. दरम्यान, राजेंद्र बदाडे, काकासाहेब बोडके, मोहन बोडके, कोंडाजी महाले आदिंचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)