शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कॉँग्रेस पक्ष क्रमांक एकवर !

By admin | Updated: July 17, 2016 00:35 IST

शिक्षणखात्याचे राज्यशास्त्र : दहावीच्या पुस्तकात दोन वर्षांपूर्वीची आकडेवारी

 नाशिक : राज्यात दोन वर्षांपूर्वी सत्तांतर झाले आणि भाजपाने सर्वाधिक जागा मिळवून क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. मात्र, दहावीच्या यंदाच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात अद्यापही कॉँग्रेस हा प्रथम क्रमांकाचा पक्ष असून, भाजपाला विधानसभेत केवळ ४६ जागाच असल्याचे अजब राज्यशास्त्र शिकवले जात आहे. नाशिकच्या रवींद्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोज पिंगळे यांनी यासंदर्भात राज्यशास्त्रातील चुका थेट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन पाठवून उघड केल्या आहेत.इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमात सामाजिकशास्त्र विषयात इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या चार विषयांचा समावेश करण्यात आला आहे. चार विषयांत मिळून शंभर गुण आहेत. त्यातील २० गुण शाळेकडे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देऊन आयएएस किंवा आयपीएस व्हायचे आहे, त्यांच्या दृष्टीने हे सर्व आवश्यक आहेत. त्यातच अशा गंभीर चुका करण्यात आल्या आहेत. राज्यशास्त्राच्या पुस्तकात विषय क्रमांक ९० वर भाजपाला अवघ्या ४६ जागा दाखविण्यात आल्या असून, कॉँग्रेस हा राज्यात क्रमांक एकचा पक्ष असून, त्याला अवघ्या ८१ जागा दाखविल्या आहेत. हा जुना म्हणजेच दोन वर्षांपूर्वीचा इतिहास शिकवला जात आहे. आता भाजपाला १२२ जागा मिळाल्या असून, हा पक्ष राज्यात कॉँग्रेस धार्जिण्या अधिकाऱ्यांनी अभ्यासक्रम बदलण्याचे कष्ट जाणीवपूर्वक घेतले नाही काय याची चौकशी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. राज्यशास्त्राच्या पुस्तकात चार प्रकरणे असून, आठ धड्यांचा समावेश आहे. त्यात लोकशाही, राजकीय पक्ष, जात व लोकशाही, धर्म व लोकशाही तसेच लोकशाही पुढील आव्हाने या प्रकरणांचा समावेश आहे. हे सर्व प्रकरणे महत्त्वाचे असताना त्यांना केवळ आठ गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकतर धडे कमी करावेत किंवा गुण वाढवून देण्याची गरज असल्याचे तावडे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)