शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:56 IST

दिंडोरी : वीज मंडळाचा कारभार सुधारावा, भारनियमन कमी करण्यात यावे व पेट्रोल, डिझेल दरवाढ, शेतमालाच्या कोसळलेला भाव, दुष्काळी स्थिती, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आदी प्रश्नांसंबंधी दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पार्टीच्या वतीने शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर सोमवारी सकाळी जनआंदोलन मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देजनआंदोलन : भारनियमन कमी करण्याची मागणी; इंधन दरवाढीचा निषेध

दिंडोरी : वीज मंडळाचा कारभार सुधारावा, भारनियमन कमी करण्यात यावे व पेट्रोल, डिझेल दरवाढ, शेतमालाच्या कोसळलेला भाव, दुष्काळी स्थिती, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आदी प्रश्नांसंबंधी दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस पार्टीच्या वतीने शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर सोमवारी सकाळी जनआंदोलन मोर्चा काढण्यात आला.आमदार नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीराम शेटे, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड आदींच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चोत झिरवाळ यांनी राज्यातील युती शासनाच्या कारभारावर जोरदार टीका करत हल्लाबोल केला. केवळ नियोजन नसल्याने विजेचे संकट निर्माण झाले असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, असे त्यांनी सांगितले.कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी, पाणी कपातीचे मोठे संकट उभे राहिले असून, शेतकºयांनी पाणी मागणी अर्ज भरून आपले हक्काचे पाणी आरक्षित करावे, असे आवाहन केले. सरकारने पेट्रोल, डिझेल गॅस, खते, औषधे, कृषी अवजारे यांच्या किमती कमी करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी भास्कर भगरे, सुनील आव्हाड, प्रकाश वडजे, अनिल देशमुख, पंडितराव गायकवाड, स्वप्नील गायकवाड, नरेश देशमुख, सचिन देशमुख, विलास कड, राजेंद्र ढगे, गोपीनाथ पाटील, शेखर देशमुख, रामदास धात्रक, शंकर काठे, संपत भरसट, आनंदराव चौधरी, डॉ. योगेश गोसावी उपस्थित होते.हक्काच्या पाण्यासाठी एकत्र यादुष्काळी स्थिती पाहता जायकवाडी धरणात कमी पाणीसाठा झाल्याने शासनदरबारी दिंडोरी तालुक्यातील शेतकºयांचे सिंचनाचे पाणी कपात करून ते पिण्यासाठी जायकवाडीत सोडण्याचा घाट घातला जात आहे. यास आपला तीव्र विरोध राहणार असून, कागदावर दिंडोरीत पाऊस जास्त दिसत असला तरी कुठे अत्यल्प तर कुठे जास्त पाऊस झाला आहे. धरणक्षेत्रात पाऊस झाला तसा वळण योजनांमुळे पाणीसाठा पूर्ण झाला. तालुक्यात दुष्काळाच्या झळा दिसत आहेत. कोणत्याही परिस्थितीत या धरणावर अवलंबून असलेल्या पिण्याच्या व शेतीसिंचनाच्या पाण्यात कपात करू नये व जयकवाडीला पाणी सोडू नये, अशी मागणी करत वेळप्रसंगी कुंदेवाडी येथून रेल्वेने पिण्यासाठी पाणी देता येईल. तरी या व वीज प्रश्नावर सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन आमदार नरहरी झिरवाळ यांनी केले.