शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस-राष्टÑवादीचे पदाधिकारी भाजपात

By sudhir.kulkarni | Updated: August 18, 2017 00:26 IST

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने पक्ष संघटन बळकट करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अन्य पक्षांतून भाजपात येणाºया राजकीय पदाधिकाºयांची गर्दी वाढली आहे. गुरुवारी (दि.१७) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राष्टÑवादी, कॉँग्रेस व शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाºयांनी भाजपात प्रवेश केला.

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने पक्ष संघटन बळकट करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अन्य पक्षांतून भाजपात येणाºया राजकीय पदाधिकाºयांची गर्दी वाढली आहे. गुरुवारी (दि.१७) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राष्टÑवादी, कॉँग्रेस व शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाºयांनी भाजपात प्रवेश केला. बोरीवली येथे भाजपाच्या राज्य कार्यकारिणीचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.१७) दुपारी या अधिवेशन काळात इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले, कॉँग्रेसचे पदाधिकारी मधुकर लांडे, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे कोषाध्यक्ष तसेच जिल्हा परिषद सदस्य रूपांजली माळेकर यांचे पती विनायक माळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य केरू खतेले, माजी पंचायत समिती सदस्य साबळे यांच्यासह दहा गावच्या सरपंचांनी भाजपात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य केरू खतेले यांनीही राष्टÑवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. या पदाधिकाºयांच्या भाजपातील प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून कॉँग्रेससह राष्टÑवादी कॉँग्रेससमोर भाजपाचे मोठे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीचे गणित जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अपक्ष निवडून आलेल्या रूपांजली माळेकर यांनी शिवसेना व कॉँग्रेसला मदत केली होती. नंतर मात्र सभापती निवडीच्या वेळी त्या भाजपा व राष्टÑवादी कॉँग्रेसच्या गोटात होत्या. माजी आमदार शिवराम झोले यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करीत जिल्हा परिषद निवडणूक शिवसेनेकडून लढविली होती. आता त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे गणित डोळ्यासमोर ठेवून भाजपात प्रवेश केल्याची चर्चा आहे.