शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेच्या राजकारणात कॉँग्रेस नेते भूमिका विसरले : विखे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:43 IST

इंदिरा गांधी यांच्या नावाने जो पक्ष उभा राहिला. त्यांच्या नावाने मते मागितली जातात आणि त्यांच्याविषयी आलेल्या वक्तव्यानंतर कॉँग्रेस मंत्र्यांनी सत्तेतून बाहेर पडले पाहिजे. परंतु सत्तेच्या राजकारणात कॉँग्रेस नेते पक्षाची भूमिका विसरले, असा आरोप माजी मंत्री आणि भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

नाशिक : इंदिरा गांधी यांच्या नावाने जो पक्ष उभा राहिला. त्यांच्या नावाने मते मागितली जातात आणि त्यांच्याविषयी आलेल्या वक्तव्यानंतर कॉँग्रेस मंत्र्यांनी सत्तेतून बाहेर पडले पाहिजे. परंतु सत्तेच्या राजकारणात कॉँग्रेस नेते पक्षाची भूमिका विसरले, असा आरोप माजी मंत्री आणि भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.नाशिकमध्ये विभागीय आाढावा बैठकीप्रसंगी आलेल्या विखे पाटील यांनी राज्य सरकारच्या धोरणांवरदेखील टीका केली. इंदिरा गांधी यांच्याविषयी राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी कॉँग्रेस नेत्यांच्या भूमिकेविषयी आपणाला आश्चर्य वाटते अशी प्रतिक्रिया देतानाच सत्तेच्या राजकारणात आपल्या नेत्याविषयी केलेल्या वक्तव्यावर सौम्य भूमिका घेणाऱ्या कॉँग्रेस नेत्यांवर त्यांनी टीका केली.विभागीय आढावा बैठक हा राज्यातील नव्या सरकारचा प्रयोग आहे. नव्या पक्षांबरोबरचा प्रयोग हा असाच नवीन प्रकार आहे. कृतीमध्ये आणि प्रत्यक्षात काम करणे यात फरक आहे. आगामी काळात प्रत्यक्षातील कामकाजावरून ते कळेलच, असेही विखे पाटील म्हणाले. शिवसेना आणि भाजप अजूनही एकत्र येऊ शकतील असे मुनगंटीवर म्हणाले, याविषयी विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी प्रत्यक्षात मुनगंटीवारांबरोबर काय चर्चा झाली मला माहीत नाही, परंतु सेना-भाजप हे नैसर्गिक मित्र आहेत ते एकत्र येण्यात काहीच वावगे नसल्याचेही त्यांनी सांगितले.पक्षविरोधी कामकाज केल्याचा आरोप भाजपाच्या नेत्यांकडून होत असल्याबद्दल विखे पाटील यांनी आपली भूमिका मांडली. पक्षाने चौकशी समिती नियुक्तकेली आहे. समितीसमोर आपण आपली बाजू मांडली आहे. समिती आपणाला न्याय देईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.त्यावेळी विरोधकांचाच संशयकोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास राष्टÑीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) दिल्याप्रकरणी राज्य सरकारने केंद्रावर पक्षपाती पणाचा आरोप केला आहे याविषयी विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी यापूर्वी विरोधात असताना कोरेगाव-भीमा तपासाबाबत पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता, आता सरकारमध्ये असताना त्यांची भूमिका कशी बदलली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Politicsराजकारण