शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेसच्या सहा नगरसेवकांची फाटाफूट?

By admin | Updated: September 13, 2014 00:55 IST

कॉँग्रेसच्या सहा नगरसेवकांची फाटाफूट?

नाशिक : महापौरपदाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांत फाटाफूट सुरू असून, कॉँग्रेसचे तीन नगरसेवक अगोदरच ‘नॉट रिचेबल’ असून, आणखी तीन नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. आमदार कोकाटे यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कॉँग्रेस शहराध्यक्षांनी कोकाटे यांनाच साकडे घातले आहे. तसेच या नगरसेवकांच्या घरावर पक्षादेश चिटकवण्यात येणार आहे.महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने अन्य पक्षांचे उमेदवार फोडण्यास सुरुवात केल्यानंतर कॉँग्रेसचे तीन नगरसेवक कॉँग्रेसच्या संपर्कात नसल्याचे सांगितले जात आहे. कॉँग्रेसचे सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे यांचे समर्थक असलेले हे तीन नगरसेवक असून, कोकाटे हे सध्या शिवबंधन बांधण्याच्या तयारीत असल्याने त्यांचे समर्थक शिवसेनेलाच मदत करणार असल्याचे सांगितले जात आहे. कॉँग्रेस शहराध्यक्ष शरद अहेर यांनी मात्र तिन्ही नगरसेवक कॉँग्रेस संपर्कात असल्याचा दावा केला आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाली असून, त्यांनीदेखील तिन्ही नगरसेवक कॉँग्रेसलाच मतदान करतील, असा शब्द दिल्याचे अहेर यांनी सांगितले. संबंधित तिन्ही नगरसेवकांच्या घरांवर पक्षादेश चिटकवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कॉँग्रेसचे गटनेता उत्तमराव कांबळे यांनी आता कॉँग्रेस, राष्ट्रवादी, आणि मनसे एकत्र आल्याने पक्षाची सत्ता येण्याची चिन्हे असून, त्यामुळे अन्य पक्षाच्या संपर्कात असलेले आघाडीलाच मतदान करतील, असा दावा केला. (प्रतिनिधी)