शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी कॉँग्रेस आक्रमक : लोकशाहीचा गळा घोटल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 01:49 IST

नाशिक : कर्नाटकमध्ये कॉँग्रेस व जेडीयूचे सर्वाधिक संख्याबळ असतानाही राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापन करण्यासाठी पाचारण केल्याने राज्यपालांनी दबावाखाली निर्णय घेतल्याचा आरोप करीत शहर कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत निदर्शने केली.

ठळक मुद्देप्रत्यक्षात त्यांच्या मनात लोकशाही बद्दल तिरस्कारकॉँग्रेस पक्षाला सर्वात जास्त जागा मिळूनही संधी नाकारण्यात आली

नाशिक : कर्नाटकमध्ये कॉँग्रेस व जेडीयूचे सर्वाधिक संख्याबळ असतानाही राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापन करण्यासाठी पाचारण केल्याने राज्यपालांनी केंद्र सरकारच्या दबावाखाली सदरचा निर्णय घेतल्याचा आरोप करीत शुक्रवारी शहर कॉँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणा देत निदर्शने केली. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले.दुपारी १२ वाजता शहर कॉँग्रेस भवनापासून मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकºयांनी कॉँग्रेसचे ध्वज व विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेतले होते. त्यात प्रामुख्याने ‘संसदेत शिरताना करतात वाकून नमस्कार, प्रत्यक्षात त्यांच्या मनात लोकशाही बद्दल तिरस्कार’, ‘सत्तेचा दुरुपयोग करणाºया केंद्र सरकारचा निषेध असो’ असे फलक होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत निदर्शने करण्यात आल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यपालांनी कर्नाटकात भाजपाला सरकार स्थापन्याची संधी देऊन लोकशाही व घटनेतील तरतुदींचा खून केला आहे. यापूर्वी मेघालय, मणिपूर, गोवा या राज्यात कॉँग्रेस पक्षाला सर्वात जास्त जागा मिळूनही संधी नाकारण्यात आली होती. कर्नाटकात राज्यपालांनी केंद्र सरकारच्या दबावाखाली येऊन हा निर्णय घेतला असून, अल्प मतात असूनही भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन लोकशाही तत्त्वाला काळीमा फासला आहे. भाजपा व केंद्र सरकार देशाला हुकूमशाहीकडे नेत असल्याने राष्टÑपतींनी यात हस्तक्षेप करून लोकशाहीचे रक्षण करावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या आंदोलनात माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर, डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, आशा तडवी, लक्ष्मण जायभावे, सुचिता बच्छाव, सुरेश मारू, मुन्ना ठाकूर, बबलू खैरे, हनिफ बशीर, उद्धव पवार, रफीक तडवी, रुबिना शेख, इसाक कुरेशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.