शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात तीन पॉवर स्टेशन असल्याने गोंधळ : फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 01:06 IST

राज्यातील सरकार अंतर्विरोधामुळेच पडेल, ते पाडण्याची गरज नाही. सध्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून आघाडीत कुरघोडीचे राजकारण सुरू असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मध्यस्थी करून वाद मिटवावे लागत आहेत. तीन पॉवर स्टेशन असल्याने गोंधळ सुरू असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

नाशिक : राज्यातील सरकार अंतर्विरोधामुळेच पडेल, ते पाडण्याची गरज नाही. सध्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून आघाडीत कुरघोडीचे राजकारण सुरू असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मध्यस्थी करून वाद मिटवावे लागत आहेत. तीन पॉवर स्टेशन असल्याने गोंधळ सुरू असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.राज्यात कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी बुधवारी (दि. ८) नाशिक शहरातील विविध रुग्णालयांना भेटी देऊन आढावा घेतला, त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही टीका केली. मुंबईसह नाशिकमधील कोरोनाबाबतची स्थिती क्रिटिकल आहे, असे सांगत त्यांनीसमूह स्तरावर चाचणीची गरज व्यक्त केली आहे. भाजप आघाडी सरकार पाडण्याचे प्रयत्न करीत असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी सामनात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी, हे सरकार आम्ही पाडणार नाही ते अंतर्गत विरोधानेच पडेल असे आम्ही अगोदरच सांगितले आहे. राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मंत्री करतात, ते मुख्यमंत्र्यांना माहितीच नसते. ते मंत्र्याना चाप लावण्यासाठी त्या बदल्या स्थगित करतात. मग शरद पवार यांना मध्यस्थी करावी लागते. राज्याच्या इतिहासात आजपर्यंत असा प्रकार घडला नव्हता, असे सांगून फडणवीस यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील सामना आता नाही. तो रोखठोक नाही. त्याला आधार नाही. सामनात देव नाही असे म्हटले जाते आणि दुसरीकडे मुख्यमंत्री पंढरपूरला जाऊन महाराष्टÑाला वाचवं असे साकडं घालतात, ज्या सामनात पूर्वी शरद पवार यांच्यावर टीका केली जात, तेच आता पवार यांचे गोडवे गातात, असे ते म्हणाले.मुंबईत अवघ्या ३३०० कोरोना चाचण्या घेऊन रुग्णसंख्या कमी असल्याचे भासवले जाते हे चुकीचे असून, किमान पंचवीस हजार चाचण्या व्हायला हव्यात, अशी मागणी करताना फडणवीस यांनी शासनाच्या सदोष अध्यादेशाच्या आधारे खासगी रुग्णालयांची मनमानी सुरू आहे. त्यामुळे अध्यादेशात सुधारणा करावी, अशी मागणीही केली.

टॅग्स :NashikनाशिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcorona virusकोरोना वायरस बातम्या