शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कसबे सुकेणे लसीकरण केंद्रावर टोकनवरून गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 16:20 IST

कसबे सुकेणे : शहरातील काशी माळी समाज मंगल कार्यालयावरील कोविड लसीकरण केंद्रावर टोकन घेण्यावरून नागरिकांत गोंधळ उडाला. दरम्यान एका व्यक्तीस अधिक टोकन दिल्याकारणाने हा गोंधळ उडला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर एका व्यक्तीस केवळ दोन टोकन देण्याचे नियोजन झाले.

ठळक मुद्देएका व्यक्तीस अधिक टोकन देत असल्याचा आरोप

कसबे सुकेणे : शहरातील काशी माळी समाज मंगल कार्यालयावरील कोविड लसीकरण केंद्रावर टोकन घेण्यावरून नागरिकांत गोंधळ उडाला. दरम्यान एका व्यक्तीस अधिक टोकन दिल्याकारणाने हा गोंधळ उडला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर एका व्यक्तीस केवळ दोन टोकन देण्याचे नियोजन झाले.कसबे सुकेणे गावाची लोकसंख्या गृहीत धरून कसबे सुकणे प्राथमिक आरोग्य केंद्राने आता शहरातील कोकणगाव रस्त्यावरील काशी माळी मंगल कार्यालयात दुसरे लसीकरण केंद्र सुरू केले आहे. गुरुवारी पहाटेपासूनच या केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. सकाळी टोकन देताना एका व्यक्तीस अधिक टोकन दिल्याने उपस्थित नागरिकांनी आक्षेप घेतला. दरम्यान दत्ता पाटील, मौजे सुकेणेचे उपसरपंच सचिन मोगल, अरुण मोगल , आनंदराव भंडारे , बाबूराव जाधव , दीपक भंडारे ,सचिन पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील यांच्याशी चर्चा करून टोकन वितरण पद्धतीत बदल करण्याची मागणी केली. त्यानुसार नवीन बदल होऊन एका व्यक्तीस आता दोन टोकन दिले जाणार आहेत.आता असे मिळणार टोकनकसबे सुकेणे केंद्रावर ऑफलाइन पद्धतीने लसीकरण सुरू असून लसीकरणाच्या दिवशी सकाळी सात वाजता केंद्रावर रांगेप्रमाणे टोकन दिले जाणार आहे. एका व्यक्तीला स्वतःचे एक व त्याच्या कुटुंबातील एकाला असे दोन टोकन मिळणार असून टोकन घेताना आता आधार कार्ड सक्तीचे झाले आहे. गावातील सोशल मीडियावर तशी पोस्ट व्हायरल झाली आहे, वैद्यकीय सूत्रांनी त्यास दुजोरा दिला आहे.कसबे सुकेणे केंद्रावर एका व्यक्तीस अधिक टोकन दिल्याकारणाने सकाळी गोंधळ झाला. सर्वांना समान लाभ मिळाला पाहिजे. टोकन देताना वशिलेबाजी होऊ नये, ही प्रशासनाला विंनती.-दत्ता पाटील, कसबे सुकेणे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतhospitalहॉस्पिटल