शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

विधी विद्याशाखेच्या परीक्षा अर्जांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:21 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विधी विद्याशाखेच्या परीक्षेच्या अर्जप्रणालीत सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विधी विद्या शाखेच्या प्रथम वर्ष एलएलबी व बीएल एलएलबीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरताना त्यांनी निवडलेल्या विषयांचे पर्याय उपलब्ध होत नसून चक्क अंतिम वर्षाच्या विषयांचे पर्याय दिसत असल्याने विद्यार्थी बुचकळ्यात पडत आहे़ परीक्षा अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे.

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विधी विद्याशाखेच्या परीक्षेच्या अर्जप्रणालीत सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विधी विद्या शाखेच्या प्रथम वर्ष एलएलबी व बीएल एलएलबीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरताना त्यांनी निवडलेल्या विषयांचे पर्याय उपलब्ध होत नसून चक्क अंतिम वर्षाच्या विषयांचे पर्याय दिसत असल्याने विद्यार्थी बुचकळ्यात पडत आहे़ परीक्षा अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने विधीशाखेच्या मागणील सत्रात विद्यार्थ्यांचे निकाल लांबविल्याने विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठ प्रशासनाविरोधात संताप वाढलेला असताना आता एलएलबी आणि बीएएलएलबी द्वितीय सत्राच्या परीक्षेसाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज संगणकीयप्रणालीत विद्यार्थ्यांना वेगळेच विषयांचे पर्याय दिसत आहेत. नाशिक विभागातून सुमारे पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांना या अडचणींचा सामना करावा लागत असून विद्यार्थ्यांनी आपली समस्या सोडविण्यासाठी नाशिक उपकेंद्र समन्वयक प्रशांत टोपे यांच्याशी संपर्क साधून परीक्षा प्रणालीतील समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले असले तरी महाविद्यालयीन स्थरावर कारवायाची कार्यवाही पूर्ण होण्यास दोन दिवस लागण्याची शक्यता असल्याने परीक्षा अर्ज करण्याची प्रक्रियाही रखडली असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.नाशिकमधून सुमारे पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांच्या बाबतीत परीक्षा अर्ज करताना अडचण येते आहे. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या पीयूएन सपोर्ट साइटवर विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती अद्ययावत केल्यानंतर विद्यार्थ्यांना अशी अडचण येणार नाही. त्यासाठी महाविद्यालयांना सूचना करण्यात आल्या आहेत.  - प्रशांत टोपे, समन्वयक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, नाशिक

टॅग्स :collegeमहाविद्यालयexamपरीक्षा