शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

बारावी परीक्षांबाबत विद्यार्थी-पालकांत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST

मालेगाव : दहावीच्या परीक्षा रद्द केल्या मात्र बारावीच्या परीक्षांचे काय, बारावी परीक्षांबाबत स्पष्टता नसल्याने प्रवेश परीक्षेचा ...

मालेगाव : दहावीच्या परीक्षा रद्द केल्या मात्र बारावीच्या परीक्षांचे काय, बारावी परीक्षांबाबत स्पष्टता नसल्याने प्रवेश परीक्षेचा अभ्यास करावा की बारावीचा, हा प्रश्न विद्यार्थ्यांना अडचणीत टाकत आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन बारावीच्या परीक्षेसंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे

देशभरातील कोरोना स्थिती पाहता, महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय कधी घेतला जाणार, असा प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून विचारला जात आहे. वर्षभरापेक्षा अधिक काळ झाला, विद्यार्थी अभ्यास करत आहेत; मात्र सीबीएसई आणि राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षांबाबत अद्याप काहीच स्पष्टता देण्यात आलेली नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा न घेता ती रद्द करून इतर पर्यायांचा विचार करावा आणि तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. बारावी परीक्षांबाबत स्पष्टता नसल्याने प्रवेश परीक्षेचा अभ्यास करावा की बारावीचा, हा प्रश्न विद्यार्थ्यांना अडचणीत टाकत आहे. लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन बारावीच्या परीक्षेसंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.

कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली मग बारावीच्या परीक्षेचे काय? दहावीप्रमाणे बारावी परीक्षेबाबत सारखाच निर्णय काय? नाही? विद्यार्थ्यांनी आणखी किती दिवस बारावीचा अभ्यास करायचा, असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून केले जात आहेत. याव्यतिरिक्त ‘कॅन्सल # १२ बोर्ड एक्झाम २०२१’ अशी ट्विटरवर मोठ्या प्रमाणात मोहीम राबविण्यात येत आहे. कारण सध्याच्या कोरोना प्रादुर्भावात आता ऑफलाईन परीक्षा शक्य नसल्यामुळे इतर पर्यायांची तातडीने चाचपणी करून योग्य तो निर्णय घ्यावा, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

राज्यात जवळपास दीड लाख बारावीचे विद्यार्थी आहेत. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ७८ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा रद्द करावी, अशी मागणी केली आहे तर ११ टक्के विद्यार्थ्यांनी इतर पर्याय अवलंबून परीक्षा घ्यावी, असे म्हटले आहे तर इतर ११ टक्के विद्यार्थिनी ऑफलाईन परीक्षा द्यायला तयार आहेत, असे स्पष्ट होत आहे.

बारावीनंतर प्रवेशावर त्याचा परिणाम होऊ शकतो का, या संदर्भात तज्ज्ञांशी संवाद साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बारावी ऑफलाईन परीक्षा रद्द केल्यास अंतर्गत मूल्यांकन करून त्याबाबत समान निकषाच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करता येऊ शकतो तसेच अंतर्गत मूल्यमापनातून निकाल जाहीर झाल्यानंतर अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी बारावी गुणांचा निकष यावर्षी शिथीलदेखील करता येऊ शकतो. मेडिकल, इंजिनिअरिंग आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना इतर प्रवेश परीक्षेच्या आधारे प्रवेश दिला जाऊ शकतो. आर्ट्स, कॉमर्स आणि इतर अभ्यासक्रम ज्यांची प्रवेश परीक्षा होत नाही त्या अभ्यासक्रमांनासुद्धा विद्यापीठ कॉलेजस्तरावर प्रवेश परीक्षा घेतली जाऊन त्याआधारे प्रवेश घेता येऊ शकेल.

तज्ज्ञांनी सुचवलेल्या काही गोष्टी शक्य असल्या तरी केंद्र सरकार आणि राज्याच्या शिक्षण विभागाला या संदर्भातील निर्णय घ्यावा लागेल. तसेच या सर्व गोष्टींसाठी तयारी करावी लागेल. प्रवेश परीक्षेचा अभ्यास करायचा की बारावी परीक्षेचा अभ्यास यामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी एक कोणता तरी निर्णय घेऊन स्पष्टता आणणे गरजेचे आहे. त्यामुळे आता बारावी परीक्षांबाबत प्रशासन काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोट...

केंद्र सरकार, राज्य सरकार व शिक्षण विभाग यांच्यानुसार निर्णय होईल. कोरोनाच्या परिस्थितीनुसार जो निर्णय होईल. तो सध्या याच्यावर चर्चा नाही.

- नितीन उपासनी, शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग

विद्यार्थ्यांचे मूल्यमापनासाठी परीक्षा घेणे गरजेचे आहे. पण विद्यार्थी किती दिवस परीक्षेची वाट पाहात आहेत. काहीतरी उपाययोजना सरकारने करावी.

- प्रा रवींद्र मोरे, मालेगाव तालुकाध्यक्ष, नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना.