शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या सुट्यांबाबत संभ्रम

By admin | Updated: August 9, 2015 22:34 IST

इंग्रजी माध्यमांना सुटी : महापालिका शाळांबाबत आज निर्णय

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात आखाड्यांचे ध्वजारोहण व पाठोपाठ येणाऱ्या शाही पर्वणीच्या काळात शहर व परिसरातील शाळा, महाविद्यालये सुरू वा बंद ठेवण्याबाबत प्रचंड संभ्रम निर्माण झाला असून, शहरातील मराठी माध्यमांच्या शाळांबाबत महापालिका शिक्षण मंडळ निर्णय घेईल, अशी भूमिका जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली आहे, तर इंग्रजी माध्यमांच्या काही शाळांनी ‘कुंभमेळा हॉलीडे’ म्हणून आपल्या अखत्यारित शाळांना सुट्याही जाहीर केल्याने पालकवर्ग आणखीनच संभ्रमित झाला आहे. नाशिक शहर व परिसर शैक्षणिक हब म्हणून ओळखला जाऊ लागला असून, शहरापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या गावांमधूनही हजारो विद्यार्थी आता ज्ञानार्जनासाठी नाशिक शहरात येऊ लागले आहेत, त्यांच्या वाहतुकीची काही संस्थांनी स्वतंत्र व्यवस्था, तर काही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात. परंतु कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आत्तापासूनच शहरातील विविध रस्त्यांचा फास आवळण्यास सुरुवात केल्यामुळे प्रत्यक्ष पर्वणी काळात व दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या आखाड्यांच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या दिवशी शहरांतर्गत व बाह्य वाहतूक व्यवस्था सुरू असेल की बंद याविषयी कोणताही सुस्पष्ट उलगडा अद्यापही होऊ शकलेला नाही, परिणामी शाळा व महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही याचा निर्णय शाळा व संस्थाचालकही घेऊ शकलेले नाहीत. मात्र शहरातील रस्तेच बंद ठेवण्याचे पोलिसांचे प्रयोजन आहे असेच चित्र सर्वत्र निर्माण झाल्याने पाल्यांना शाळेत पाठवावे की नाही अशा संभ्रमात पालक सापडले आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करणाऱ्या शासकीय यंत्रणेच्या मते गत सिंहस्थात फक्त पर्वणीच्या दिवशीच शाळांना सुटी देण्यात आली होती, यंदाही तसेच नियोजन असेल असे मोघम उत्तर देण्यात आले, तर मध्यंतरीच्या काळात विभागीय आयुक्तांनी शिक्षण उपसंचालकांना पत्र पाठवून शैक्षणिक सुट्यांच्या दिवसांची यादीही मागविली होती, त्या यादीच्या आधारे सुट्या दिल्या जाऊ शकतात असा अंदाज बांधला जात आहे. प्रत्यक्षात अद्यापही त्यावर अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे शहरातील होरायझन, मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या शाळांना ध्वजारोहणाच्या दिवशी म्हणजेच १९ आॅगस्ट रोजी सुटी जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र ही सुटी समाजदिनानिमित्त देण्यात आल्याची माहिती संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार यांनी दिली. शहरातील अन्य शाळांबाबतही संभ्रम असून, बहुतांशी शाळाचालकांनी शासनाच्या आदेशान्वये शाळांना सुट्या दिल्या जातील, असे जाहीर केले आहे. (प्रतिनिधी)