शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीत सत्ताधारी- विरोधी गटात संघर्ष

By admin | Updated: March 26, 2017 22:29 IST

दिंडोरी : दिंडोरी नगरपंचायतमध्ये सत्ताधारी नगरसेवक व विरोधी दिंडोरी शहर विकास आघाडी यांच्यातील वाद आता दिवसागणिक वाढताना दिसत आहे.

दिंडोरी : दिंडोरी नगरपंचायतमध्ये सत्ताधारी नगरसेवक व विरोधी दिंडोरी शहर विकास आघाडी यांच्यातील वाद आता दिवसागणिक वाढताना दिसत आहे. नुकत्याच नगरपंचायतीच्या विषय समितीच्या निवडणुकीवर विरोधी गटाच्या नगरसेवकांनी विकासकामे होत नसल्याचे कारण पुढे करत बहिष्कार टाकला होता. याला सत्ताधारी गटाने उत्तर दिल्यानंतर दिंडोरीच्या नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी विकास या मुद्द्यावर खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. एकंदरीत सत्ताधारी व विरोधक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगत आहे.सत्ताधारी हे सगळे आम्हीच केले अशी फुशारकी मारत आहेत. हे चुकीचे आहे. आजही पाण्याच्या टाक्यांचे काम अपूर्ण असून, ४ ते ५ दिवसाआड पाणीपुरवठा होतो आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या शौचालयाची संकल्पना मोडीत काढून कालबाह्य संकल्पना राबविण्याची किमया केली असून, वैयक्तिक शौचालयाचा निधी मंजूर करून सार्वजनिक शौचालय बांधून वाचणारा पैसा कुठे जातो याचा हिशेब कुठे जातो हा संशोधनाचा मुद्दा आहे. मंजूर रस्त्याचे काम हे नगरसेवक शिवाजी देशमुख यांच्या प्रभागातून न नेता विरुद्ध दिशेने नेले. आठवडे बाजाराची प्रणालीही संशयास्पद आहे. यावर अगोदर चर्चा होणे गरजेचे आहे. आता समोरासमोर चर्चेला तयार व्हावे, असे आवाहन प्रमोद देशमुख व शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी केले आहे. (वार्ताहर)दिंडोरीच्या नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी विकास या मुद्द्यावर खुल्या चर्चेचे आव्हान सत्ताधारी गटाला दिले असून, नगरपंचायतीच्या कारभारावर निवेदनाद्वारे टीकास्त्र सोडले आहे. शहर विकास आघाडीचे गटनेते प्रमोद देशमुख यांनी सांगितले की, दिंडोरीच्या ओझरखेड पाणी योजनेचा प्रश्न खासदार, आजी-माजी आमदार, पाणीपुरवठा कमिटीचे सभापती, सदस्य व जनतेच्या पाठपुराव्याला यश आल्याने मार्गी लागला. यासाठी शहर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक ग्रामस्थांसोबत आमरण उपोषणाला बसले होते. या सर्वांच्या सांघिक प्रयत्नाला अखेर यश आल्याने ही योजना पूर्ण झाली.