पाटोदा : पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याची चाचणी घेण्यासाठी पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी कातरणी येथील कालव्यावर सुरु असलेले उपोषणा दुसऱ्या दिवशी सुरूच असुन यातील चार उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली असुन त्यांना पुढील उपचारासाठी येवला येथील शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहन शेलार यांनी उपचार करून घेण्यास विरोध दर्शविला असुन जोपर्यंत पुणेगावचे पाणी दरसवाडीत व दरसवाडीचे पाणी पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याद्वारे बाळापुर पर्यंत सोडले जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्यात येणार असुन आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. या उपोषणास सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला असून शिवसेना नेते संभाजी पवार, साहेबराव सैद पाटील, देवचंद गायकवाड, शिवसेना उपजिल्हाध्यक्ष वाल्मिक गोरे ,धोंडीराम कदम ,अशोक गायकवाड, संदीप शिंदे ,अरु ण शेलार , साहेबराव आहेर, शेतकरी संघटना अध्यक्ष संतू पा झांबरे, जि प सदस्य प्रवीण गायकवाड, रमेश कोल्हे, चांदवड पुणेगाव कृती समिती अध्यक्ष तुकाराम सोनवणे, अरु ण शिरसाठ ,प्रभाकर बोरणारे, कृ.उ.बा.संचालक संजय बनकर, चांदवड तालुक्यातील पाटपाणी लाभक्षेत्रातील अनेक शेतकरी यांनी या उपोषणास सशर्त पाठींबा दिला आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी संभाजी पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पुणेगाव दरसवाडी पोच कालव्यासाठी आता प्रतीक्षा करत बसण्यापेक्षा सर्वानीच हे आंदोलन अजून तीव्र कसे करता येईल व त्यातून सर्वाना जिव्हाळ्याचा वाटत असलेला हा प्रश्न मार्गी कसा लागेल ? यासाठी या उपोषणास सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.दरम्यान कालवाप्रशनी उपोषणास बसलेले सुमनबाई कदम,सोपान पगार,श्रावण वाघमोडे,व मोहन शेलार आदि उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली असुन यातील तिघांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असुन मोहन शेलार यांनी जोपर्यंत कालव्यास चाचणीसाठी पाणी सोडले जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच असुन कोणत्याही प्रकारचे उपचार घेणार नसल्याचे सांगितले. (वार्ताहर)
चार उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली
By admin | Updated: August 25, 2016 00:46 IST