शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पूररेषेत कॉँक्रिटीकरणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:22 IST

स्मार्ट सिटी अंतर्गत गोदाकाठी साकारण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट गोदाचा पहिला टप्पाही वादात सापडला आहे. रामवाडी ते होळकर पुलाच्या दरम्यान सुरू असलेल्या कामात पूररेषेत चक्क सीमेंटचे काम सुरू असल्याने उच्चाधिकार समितीच्या सदस्यांनी हरकत घेतली आहे. गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने गठीत उच्चाधिकार समितीचे सदस्य राजेश पंडित आणि प्राचार्य प्राजक्ता बस्ते यांनी यासंदर्भात आक्षेप घेतला आहे.

ठळक मुद्देपर्यावरणप्रेमींची हरकत : ‘निरी’ची परवानगी नसल्याचा दावा

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत गोदाकाठी साकारण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट गोदाचा पहिला टप्पाही वादात सापडला आहे. रामवाडी ते होळकर पुलाच्या दरम्यान सुरू असलेल्या कामात पूररेषेत चक्क सीमेंटचे काम सुरू असल्याने उच्चाधिकार समितीच्या सदस्यांनी हरकत घेतली आहे. गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने गठीत उच्चाधिकार समितीचे सदस्य राजेश पंडित आणि प्राचार्य प्राजक्ता बस्ते यांनी यासंदर्भात आक्षेप घेतला आहे.‘प्रोजेक्ट गोदा’अंतर्गत गोदावरी नदीच्या काठावर सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात रामवाडी ते होळकरपूल हा पहिला टप्पा आहे. त्यात विविध अ‍ॅक्टिव्हिटी व्यवस्था असणार आहे. अ‍ॅक्युप्रेशर वॉक, जॉगिंग ट्रॅक, कारंजा यांसह आकर्षक प्रवेशद्वारदेखील सादर करण्यात येणार आहे. सुमारे ६८ कोटी रुपयांचा हा पहिला टप्पा आहे. मात्र, ही सर्व कामे गोदावरी नदीच्या निळ्या पूररेषेत आहेत. नियमानुसार नदीपात्र ते निळी पूररेषा याठिकाणी बगिचा आणि खुली जागाच अनुज्ञेय आहे. कोणत्याही प्रकारचे बांधकाम अनुज्ञेय नाही. निळ्यारेषेपासून लालरेषेत स्टिल्ट बांधकाम म्हणजेच काही उंचीवरील बांधकाम अनुज्ञेय आहे. परंतु प्रोजेक्ट गोदा अंतर्गत निळ्या पूररेषेत सीमेंटची कामे सुरू आहेत.काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतदेखील याबाबत प्राचार्य बस्ते आणि राजेश पंडित यांनी याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर दोघांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली. यावेळी सीमेंटचे बांधकाम सुरू होते. याशिवाय येथील अधिकारी सिंग यांनी निरीची या प्रकल्पासाठी मान्यता असल्याचे सांगितले. यावर पंडित यांनी निरीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी निरीची परवानगी नसल्याचे सांगितले, असे पंडित यांचे म्हणणे आहे. त्यामुळे निरीची परवानगी नसताना सुरू असलेले बांधकाम थांबावावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.गॅबियन वॉललगत सीमेंटची भिंतपर्यावरणाच्या निकषानुसार नदीकाठी सीमेंटची संरक्षक भिंत बांधता येत नाही. यापूर्वी पखालरोड येथे बांधकाम करताना त्यास विरोध झाल्यानंतर हे काम थांबविण्यात आले होते. मात्र, रामवाडीलगत गॅबियन (दगडांचे थर त्यावर जाळी) वॉल असून, त्यामागे सीमेंटची भिंत बांधण्याचा अजब प्रकार सुरू होता. त्यासदेखील विरोध करण्यात आला आहे.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी