शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाण्यातील रस्त्याचे कॉंक्रिटीकरण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 00:57 IST

सुरगाणा : गेल्या पाच महिन्यांपासून रखडलेले कॉंक्रिट रस्त्याचे काम वारंवार मागणी करूनही त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याने या रस्त्यावरच उपोषण करण्याचा इशारा येथील भाजपचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन महाले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : रस्त्यावर ठिय्या मांडण्याचा इशारा

सुरगाणा : गेल्या पाच महिन्यांपासून रखडलेले कॉंक्रिट रस्त्याचे काम वारंवार मागणी करूनही त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याने या रस्त्यावरच उपोषण करण्याचा इशारा येथील भाजपचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन महाले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.दुसरे लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी शहराचे प्रवेशद्वार म्हणून असलेल्या होळी चौक ते अपना बेकरी असलेल्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. कॉंक्रिटीकरण असलेल्या या रस्त्याचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे सुरुवात करणे आवश्यक होते. मात्र या ठिकाणी आणून टाकलेली खडी निकृष्ट दर्जाची असून, या रस्त्याचे काम सुरू होऊ शकलेले नाही.

आउटलाइन न करता रस्त्याच्या बाजूने टाकण्यात आलेले गटारीचे काही पाइप फुटले आहेत. परिणामी उताराच्या बाजूने असलेल्या घरांमध्ये गटारीचे पाणी घुसण्याचा प्रकार घडला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून हे काम रखडले आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी संबंधित ठेकेदाराने बारा दिवसांत रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु रस्त्याचे काम झाले नाही. वार्ड क्रमांक १ व २ मधील रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सर्वच रस्ते कामांची गुणवत्ता नियंत्रण मार्फत चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष रमेश थोरात, भावडू चौधरी,बाळकृष्ण सूर्यवंशी, छोटूशेठ दवंडे, कैलास सूर्यवंशी, संजय पवार, योगेश चव्हाण, दिनकर पिंगळे आदी उपस्थित होते.शहरला गढूळ पाणीपुरवठाशहरात पिण्यासाठी गढूळ पाण्याचा नळाद्वारे पुरवठा केला जात असून, स्वच्छ पाणी देण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. येत्या चार-पाच दिवसांत पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा न केल्यास २२ जूनपासून आंदोलन छेडण्याचा इशारा तहसीलदार किशोर मराठे यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाStrikeसंप