शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

बीजेएसच्या मिशन झीरो व मिशन लसीकरण मोहिमेची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:19 IST

नाशिक : कोरोनावर मात करण्यासाठी भारतीय जैन संघटना या स्वयंसेवी संस्थेने नाशिक जिल्ह्यासह राज्यात मार्च २०२० पासून रचनात्मक व ...

नाशिक : कोरोनावर मात करण्यासाठी भारतीय जैन संघटना या स्वयंसेवी संस्थेने नाशिक जिल्ह्यासह राज्यात मार्च २०२० पासून रचनात्मक व सर्वव्यापी कार्य सुरू ठेवले आहे. त्याअंतर्गत १० मे २०२१ पासून सुरू केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील मिशन झीरो आणि मिशन लसीकरण मोहिमेची बुधवारी सांगता करण्यात आली.

मिशन लसीकरण हे अभियान नाशिक महानगरपालिका व भारतीय जैन संघटना यांच्या वतीने पंचवटी, नाशिक रोड, नाशिक पश्चिम विभागात दि १० मे २०२१ पासून सुरू करण्यात आले होते. गत ३ महिन्यांच्या अथक मेहनतीनंतर या अभियानाला बीजेएसच्या वतीने तूर्त विराम देण्यात आला आहे. या कालावधीत १५ लसीकरण केंद्रांवर ५०११२ व्यक्तींच्या अँटिजेन चाचण्या होऊन त्यातून २२१ पॉझिटिव्ह रुग्णांना लवकर शोधण्यात यश येऊन त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयाकडे वर्ग करण्यात आले. तसेच ६५२५६ व्यक्तींचे अत्यंत शिस्तीने व लसीकरणाकरिता केंद्रावर आलेल्या वयस्कर व विशेष व्यक्तींना सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन लसीकरण पूर्ण करण्यात आले. त्या अभियानास वॉटर ग्रेस कंपनी, नाशिक वॉरियर्स व शिवानंद इलेक्ट्रॉनिक्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथा, महापौर सतीश कुलकर्णी, मनपा आयुक्त कैलास जाधव, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे बीजेएसचे राज्य प्रभारी व प्रकल्प संचालक नंदकिशोर सांखला यांनी सांगितले. तसेच भविष्यातही गरजेनुसार पुन्हा कार्यासाठी सज्ज राहणार असल्याचे सांखला यांनी नमूद केले.

इन्फो

दीड वर्ष अविरत कार्य

गत दीड वर्षात बीजेएसच्या पुढाकाराने राज्यस्तरावर मोठ्या प्रमाणावर सेवाकार्य सुरू आहे. नाशिक शहरात फूड पॅकेट्स, किराणा सामानाचे किट, मास्क व सॅनिटायझरचे गरजूंना वेळोवेळी वितरण करण्यात आले.त्याशिवाय फिरत्या दवाखान्याद्वारे १२३४७ रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यांना गरजेनुसार वैद्यकीय सेवा व विनामूल्य औषधे पुरविण्यात आली. त्यातून पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यात यश मिळाले. त्याशिवाय विविध रक्तदान शिबिरांतून ४७९ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. त्याशिवाय जनजागृती अभियान, तापमान व प्राणवायू प्रमाण तपासणी, आरटीपीसीआर स्वॅप चाचण्या, प्लाझ्मादान, अल्प दरात एचआरसीटी- सिटी स्कॅन चाचणी, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची उपलब्धता, कोविड-१९ मुळे आईवडील किंवा वडील किंवा आई गमावलेल्या इयत्ता ५ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुनर्वसनासाठी बीजेएस वाघोली शैक्षणिक पुनर्वसन केंद्रात प्रवेश देणे असे कार्य अविरत सुरू ठेवले आहे.