काँग्रेसने सुरू केलेल्या विविध योजनांची नावे बदलून नव्या योजना आणल्याचा केंद्र सरकार भास निर्माण करीत असल्याचा आरोप करून भानुदास माळी यांनी जंतरमंतरवर तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले. राज्यातील २६ जिल्ह्यांत दौरा करून त्यांनी ओबीसी लोकांशी संवाद साधला. त्यानंतर मालेगावी आबोसी आरक्षण मेळावा घेऊन माळी यांच्या दौऱ्याची सांगता करण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, अ.भा. काँग्रेस कमिटी सदस्य प्रसाद हिरे, ओबीसी विभाग अध्यक्ष वाय.के खैरनार, तालुका अध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, धर्मा भामरे, मंगला भामरे, नगरसेवक नंदू सावंत, रामदास बोरसे, ओबीसी शहराध्यक्ष मयूर वांद्रे यांनी मार्गदर्शन केले. माळी यांनी काँग्रेस कमिटी कायार्लयात कार्यकर्त्यांशी संवाद साधून चर्चा केली. यावेळी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. सूत्रसंचलन वाय. के. खैरनार यांनी केलेे, तर आभार सतीश पगार यांनी मानले.
काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:17 IST