शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वीज देयके  दोन टप्प्यात भरण्याची सवलत द्यावी ; ग्राहकांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 14:15 IST

लॉकडाऊनमधून शिथिलता दिली जात असतानाच महावितरणकडून गेल्या तीन महिन्यानंतर वीज देयके वाटप करण्यात येत आहे. परंतु गत तीन महिन्यात लॉकाऊनमुळे अनेकांचे उद्योगधंदे प्रभावित झाले असून अनेकांंना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांसमोर वीज बीलांची देयके कशी अदा करायची असा प्रश्न ग्राहकांसमोर निमार्ण झाला आहे. 

ठळक मुद्दे ग्राहकांची विजबिलात सवलत देण्याची मागणी दोन टप्प्यात बील भरण्याची सवलत मिळावीलॉगकाऊनमुळे सामान्य ग्राहक आर्थिक अडचणीत

नाशिक : कोरोनाच्या काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून शिथिलता दिली जात असतानाच महावितरणकडून गेल्या तीन महिन्यानंतर वीज देयके वाटप करण्यात येत आहे. परंतु गत तीन महिन्यात लॉकाऊनमुळे अनेकांचे उद्योगधंदे प्रभावित झाले असून अनेकांंना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांसमोर वीज बीलांची देयके कशी अदा करायची असा प्रश्न ग्राहकांसमोर निमार्ण झाला असून वीज देयके अदा करणे अडचणीचे होत असल्याने महावितरणकडून दोन टप्प्यात वीजबीलांची देयके अदा करण्याची सवलत द्यावी अशी मागणी नाशिकरांकडून होत आहे. सरकारने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत दोन महिन्यात कडेकोट लॉकडाऊन लागू केला होता. त्यामुळे नोकरदार वर्गातील अनेक नागरिकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर अनेकांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आली आहे. त्याचप्रमाणे उद्योगधंदेही लॉकडाऊनमुळे प्रभावित झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना आथिर्क अडचणींचा सामना करावा लागत अशा परिस्थितीतच महावितरणने वीज बीलांचे वितरण करून देयके अदा करण्याचे आवाहन करीत वसुलीला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे महावितरणने गेल्या दोन महिन्यांत सरासरी वीजबीलांचे वितरण केले आहे. त्यामुळे ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा निर्माण होणार आहे. त्यामुळे दोन टप्प्यात वीज देयके भरण्याची सवलत द्यावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.