मनमाड : भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन तालुक्यातील रुग्णालयात भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याची मागणी केली. या समस्या सोडविण्यासाठी योग्य ते निर्देश द्यावेत अशा आशयाचे निवेदन शिष्टमंडळाने डॉ. पवार यांना दिले.जिल्ह्यातील मनमाड, नांदगावसह सर्व शासकीय रुग्णालयात जेवण, नाश्ता, चहा तसेच खाण्या-पिण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने गरोदर माता तसेच उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. शासन स्तरावर याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी. म्हणजे सर्वच ठिकाणी ही सुविधा उपलब्ध झाली तर मुख्य समस्या दूर होऊन रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळू शकेल असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी नांदगाव विधानसभा अध्यक्ष राजेंद्र पवार, तालुका अध्यक्ष बापूसाहेब जाधव, उमेश उगले, अशोक पवार, सुधाकर पवार, छबू सोमसे आदी उपस्थित होते.
रुग्णालयातील समस्यांबाबत साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 01:15 IST
मनमाड : भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन तालुक्यातील रुग्णालयात भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याची मागणी केली. या समस्या सोडविण्यासाठी योग्य ते निर्देश द्यावेत अशा आशयाचे निवेदन शिष्टमंडळाने डॉ. पवार यांना दिले.
रुग्णालयातील समस्यांबाबत साकडे
ठळक मुद्देतालुक्यातील रुग्णालयात भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याची मागणी