शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

एबी फॉर्मची चिंता, उद्यापर्यंतच मुदत

By admin | Updated: February 2, 2017 01:36 IST

धडधड वाढली : उमेदवारांचा जीव टांगणीला

नाशिक : आॅनलाइन प्रणालीद्वारे अर्ज भरून झाला, निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्जाची प्रतही दाखल झाली, परंतु जोपर्यंत पक्षाकडून अधिकृत उमेदवारीचा एबी फॉर्म मिळत नाही तोवर पक्षीय उमेदवारी अंतिम होणार नाही. यंदा महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांच्या चिन्हांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना एबी फॉर्म नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंतच जमा करता येणार आहे. राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवार घोषित करण्यास विलंब लावला जात असल्याने इच्छुक उमेदवारांची धडधड वाढली असून, साऱ्यांचा जीव एबी फॉर्ममध्ये अडकला आहे.महापालिका निवडणुकीसाठी दि. २७ जानेवारीपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, सहा दिवस उलटून गेल्यानंतर केवळ १११ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आता अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. अद्याप राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची अधिकृतपणे घोषित करण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारी अर्जावर पक्षाचे अधिकृत नाव टाकायचे किंवा नाही, या चिंतेत उमेदवार आहेत. त्यामुळे अनेक उमेदवारांनी पक्षाचे नाव न टाकताच अर्ज दाखल करून ठेवले आहेत. राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना अर्जासोबत एबी फॉर्म जोडणे बंधनकारक आहे. यापूर्वी महापालिका निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांकडून मिळणारे एबी फॉर्म अर्ज माघारीच्या प्रक्रियेपर्यंत जमा करण्याची मुभा होती. परंतु, यंदा राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी एबी फॉर्म हा नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंतच जमा करता येणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी दि. ३ फेबु्रवारीपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. आता अर्ज दाखल करण्यासाठी दोनच दिवस उरले असल्याने मुदतीत अर्जासोबत एबी फॉर्म जोडण्यासाठी राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची धावपळ उडणार आहे. दोन दिवस उमेदवारांचे एबी फॉर्मकडेच डोळे लागणार असून आपला ऐनवेळी पत्ता कट होणार नाही, याचीही खबरदारी घेतली जात आहे. (प्रतिनिधी)