शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटाविषयी संशयकल्लोळ

By admin | Updated: November 27, 2015 22:45 IST

पाणवेली हटविण्याचा प्रस्ताव

 नाशिक : गोदावरी नदीपात्रातील पाणवेली व निर्माल्य फ्लोटिंग ट्रॅश स्किमर मशिनरीमार्फत हटविण्यासाठी आठ तासांकरिता ५५ हजार रुपये मोजण्याच्या प्रस्तावाबाबत स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी संशय व्यक्त केला. आरोग्याधिकाऱ्यांनी सदर खर्च सिंहस्थ निधीतून होणार असल्याचे उत्तर दिल्यानंतर सभापतींनी जेव्हा पाणवेली असेल तेव्हाच त्याचा वापर करण्यास मंजुरी दिली. गोदावरी नदीपात्रातील पाणवेली, निर्माल्य व तत्सम तरंगत्या वस्तू हटविण्यासाठी मुंबईतील क्लिनटेक इंडिया या संस्थेकडून तीन महिने कालावधीसाठी ५५ हजार रुपये प्रति शिफ्ट व प्रति मशीन काम करून घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाबाबत बोलताना प्रा. कुणाल वाघ यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत संशय व्यक्त केला. आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी सदर संस्थेने यापूर्वी सिंहस्थात मोफत काम केल्याचे स्पष्ट केल्यानंतर तर सदस्यांचा संशय आणखी बळावला. वाघ यांनी सांगितले, अगोदर फुकट काम करायचे आणि नंतर कोट्यवधी रुपयांचे कंत्राट पदरात पाडून घ्यायचे. हा सारा व्यवहारच संशयास्पद असून, त्याची सविस्तर माहिती मिळेपर्यंत प्रस्ताव तहकूब ठेवण्याची मागणी केली. यापूर्वी अवघ्या दोन लाखांत मजूर संस्थांमार्फत पाणवेली काढण्याचे काम केले जात होते, याची आठवणही वाघ यांनी करून दिली. सुरेखा भोसले यांनीही आता सद्यस्थितीत पाणवेली नसताना सदरचा प्रस्ताव स्थायीवर कशासाठी आणल्याचा जाब विचारला आणि घंटागाडी व पेस्टकंट्रोलच्या ठेक्याबाबत उदासीन असलेल्या प्रशासनाच्या या तत्परतेबद्दल त्यांनी आश्चर्यही व्यक्त केले. त्यावर आरोग्याधिकारी डॉ. डेकाटे यांनी सांगितले, सध्या या मशिनरीची गरज नाही परंतु सिंहस्थ निधी परत जाऊ नये यासाठी मान्यतेकरिता प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)