शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मानधनासाठी संगणक परिचालकांचे आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 00:52 IST

ग्रामपंचायत पातळीवर सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या संगणक परिचालकांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नसून, त्यांना त्वरित मानधन देण्यात यावे, त्याचबरोबर मानधनात वाढ करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

एकलहरे : ग्रामपंचायत पातळीवर सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या संगणक परिचालकांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नसून, त्यांना त्वरित मानधन देण्यात यावे, त्याचबरोबर मानधनात वाढ करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या कामकाजावर परिणाम होत आहे.शासनाने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक गावात आॅनलाइन दाखले व सुविधा देण्यासाठी राज्यातील २५ हजार ग्रामपंचायतींंमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संगणक परिचालक प्रामाणिकपणे काम करत आहेत. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्रामार्फत संगणक परिचालकांची नेमणूक केली आहे. केवळ सहा हजार रुपये इतकाच तुटपुंजा मासिक पगार या परिचालकांना दिला जातो. मात्र तोही चक्क सहा सहा महिने दिलाच जात नाही. सध्या संगणक परिचालकांचे गेल्या सहा महिन्यांपासून पगार दिलेले नाहीत. यासंदर्भात संगणक परिचालकांनी मुंबई येथे आंदोलन केले असता मुख्यमंत्र्यांनी १० ते १२ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले, परंतु त्याची पूर्तता होऊ शकली नाही. त्यामुळे राज्यातील सर्व संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यासंदर्भात संगणक परिचालकांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांना मागण्यांचे निवेदन दिले असून, त्यात राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी. महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती देणे, प्रतिमहिना किमान वेतन १५००० रुपये द्यावे, संगणक परिचालकांचे मागील एप्रिल २०१७ ते जुलै २०१९ पर्यंतचे सर्व थकीत मानधन देणे आदि मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष शांताराम बेंडकुळे, हिरामण बेंडकुळे, निशांत डंबाळे, विनायक सूर्यवंशी, कैलास मोंढे, लहानू कचरे, राहुल पारधी, अनिल अवचट उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान (शेतकरी कर्जमाफी) योजनेचे मानधन देणे, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणचे आॅनलाइन सर्व्हे केलेले मानधन मिळावे, नोटीस न देता कामावरून कमी केलेल्या संगणक परिचालकांना परत कामावर घ्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Governmentसरकारgram panchayatग्राम पंचायत