शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावला ४८२२ प्रकरणांमध्ये तडजोड विधि सेवा समिती : ७२ लाख ५९ हजार ८९२ रु पये एवढी विक्र मी वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:46 IST

तालुका विधि सेवा समिती व वकील संघ यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दाखलपूर्व प्रकरणे व प्रलंबित प्रकरणे समजुतीसाठी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते.

नांदगाव : तालुका विधि सेवा समिती व वकील संघ यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दाखलपूर्व प्रकरणे व प्रलंबित प्रकरणे समजुतीसाठी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तडजोडीच्या माध्यमातून न्यायालयीन व विविध संस्थांच्या ४८२२ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन तब्बल ७२ लाख ५९ हजार ८९२ रु पये एवढी विक्र मी वसुली झाली. या वसुलीत सर्वाधिक ग्रामपंचायत कार्यालयाच्या ३८८७ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ५२ लाख ४४ हजार ४९ रुपये वसूल करण्यात आले.तसेच प्रलंबित प्रकरणांपैकी ४ दिवाणी प्रकरणे व इतर ६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. रविवारी सकाळी राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे करण्यात आले. या प्रसंगी तालुका विधि सेवा समिती अध्यक्ष तथा न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रेरणा दांडेकर म्हणाल्या की, राष्ट्रीय लोकअदालतीमुळे लोकसेवा करण्याची संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाप्रति असलेले आपले कर्तव्य बजावण्याची भावना आपल्या मनात असू द्यावी. या राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून देशसेवेची भावना जागृत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी लोकअदालत ही लोक चळवळ व्हावी, असे मत व्यक्त केले होत. त्या अनुषंगाने राष्ट्रीय लोकअदालतीद्वारे तालुक्यात जनजागृती मोहीम राबविण्यात आली. राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यात सगळ्यांचा सहभाग असावा, असेही त्या शेवटी म्हणाल्या. यावेळी न्यायालय आवारात भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीसह मांडवड, बोलठाण, परधाडी, गंगाधरी, कळमदरी या गावांतील ग्रामपंचायतींच्या वतीने करवसुलीसाठी स्टॉल्स उभारण्यात आले होते. लोकअदालतीमध्ये व्ही. पी. अहेर, योगेश जमदाडे, जे. टी. सूर्यवंशी, सचिन वांगडे आदी उपस्थित होते.