शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

संगणकीय सातबाºयाला सर्व्हरचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:33 IST

तेरा गावांचे अद्ययावतीकरण : १९०० गावांना प्रतीक्षा नाशिक : स्वातंत्र्य दिनापासून खातेदारांना आॅनलाइन प्रणालीने संगणकीय सातबारा देण्याचा राज्यव्यापी शुभारंभ केला जात असताना दुसरीकडे हस्तलिखित सातबारा व संगणकीय सातबारा यांच्यातील तफावत दूर करणारे ‘रि-इडिट’ सॉफ्टवेअरला सर्व्हर डाउनचा फटका बसल्याने जिल्ह्यातील जेमतेम १३ गावांमध्येच अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण होऊ शकले आहे.

तेरा गावांचे अद्ययावतीकरण : १९०० गावांना प्रतीक्षानाशिक : स्वातंत्र्य दिनापासून खातेदारांना आॅनलाइन प्रणालीने संगणकीय सातबारा देण्याचा राज्यव्यापी शुभारंभ केला जात असताना दुसरीकडे हस्तलिखित सातबारा व संगणकीय सातबारा यांच्यातील तफावत दूर करणारे ‘रि-इडिट’ सॉफ्टवेअरला सर्व्हर डाउनचा फटका बसल्याने जिल्ह्यातील जेमतेम १३ गावांमध्येच अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण होऊ शकले आहे. डिजिटल इंडिया या शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमान्वये ई-सेवा प्रणालीद्वारे नागरिकांना अधिकाधिक शासकीय सेवा देण्याचा भाग म्हणून शासनाने खातेदारांना संगणकीय सातबारा उतारा देण्याचे ठरविले आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या संदर्भातील काम सुरू असून, त्यासाठी गावोगावच्या तलाठ्यांना लॅपटॉप, इंटरनेटची जोडणीदेखील उपलब्ध करून देण्यात आली. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून महसूल दप्तरात हस्तलिखितच नोंदणी केली जात असल्याने जुने व जीर्ण झालेल्या दप्तराच्या नोंदी अद्ययावत करण्याचे अवघड काम कसेबसे पूर्ण करण्यात आले आहे.हस्तलिखित सातबारा उताºयाची संगणक प्रत तयार करण्याचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आलेले असले तरी, हस्तलिखित सातबारा उताºयावरील नोंदी व संगणकातील नोंदींची अचूकता तपासण्यासाठी शासनाने एडिट मॉड्यूल या सॉफ्टवेअरचा आधार घेतला. तलाठ्याने तयार केलेला सातबारा या एडिट मॉड्यूलच्या आधारे मंडल अधिकाºयाने तपासून तो योग्य असल्याचे नमूद केले. गेल्या महिन्यात तयार झालेल्या सातबारा उताºयाचे गावोगावी तलाठ्यांमार्फत चावडी वाचन करण्यात आले. त्यात प्रामुख्याने सातबारा उताºयावरील नावे, जागेचा आकार, इतर हक्कात असलेली नोंद, पीक पाहणी आदी बाबींबाबत खातेदारांना अवगत करण्यात आले, त्यासाठी हस्तलिखित सातबारा व संगणकीय सातबारा उतारा पाहणीसाठीही खुला करण्यात आला. या चावडी वाचनानंतर खातेदारांच्या सूचना व हरकतींची दखल घेऊन सातबारा उतारा बिनचूक करण्यासाठी ‘रि-इडिट’ मॉड्यूल सॉफ्टवेअर तयार करण्यात आले. तथापि, गेले काही दिवस हे सॉफ्टवेअर चालेनासे झाल्याने तलाठ्यांचाही उपाय खुंटला.नाशिक जिल्ह्यात १९०६ महसूली गावे असून, त्यातील सहा गावे सोडल्यास १९०० गावांमध्ये चावडीवाचन करण्यात येऊन सातबारा उताºयाच्या दुरुस्त्या स्वीकारण्यात आल्या. त्याची दुरुस्ती केली जात असताना ‘रि-इडिट’च्या सॉफ्टवेअरला सर्व्हर डाउनचा फटका बसल्याने बुधवार अखेर फक्त १३ गावांचेच सातबारा उतारे अद्ययावतीकरण करण्यात आले आहेत. या गावांचे सातबारा उतारे आॅनलाइन प्रणालीने अचूक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी, शासनाने व प्रशासनानेही स्वातंत्र्यदिनापासून आॅनलाइन उतारे देण्याच्या केलेल्या घोषणेची पूर्तता कशी होणार, हा प्रश्न कायम आहे.काम अपुरे, पण सत्काराची घाईसंगणकीय सातबारा उतारा अद्ययावतीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना नाशिक विभागात उत्कृष्ट काम करणारे तलाठी, मंडल अधिकाºयांचा १५ आॅगस्ट स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री, विभागीय आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्याचे घाटत आहे. त्यासाठी तहसीलदार, उपविभागीय अधिकाºयांकडून नावे मागविण्यात आली आहेत. याच दिवशी आॅनलाइन प्रणालीने खातेदारांना संगणकीय सातबारा उताºयाचे वितरणही करण्यात येणार आहे.