शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी पूर्वभागात संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:10 IST

बहुजन क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या भारत बंदला शहरातील सर्वच राजकीय, सामाजिक व धार्मिक संघटनांनी पाठिंबा दिला. शहरातील पूर्व भागातील व्यापाऱ्यांनी व्यवहार पूर्णत: बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.

ठळक मुद्देभारत बंद : पोलिसांकडून चोख बंदोबस्त

मालेगाव मध्य : बहुजन क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या भारत बंदला शहरातील सर्वच राजकीय, सामाजिक व धार्मिक संघटनांनी पाठिंबा दिला. शहरातील पूर्व भागातील व्यापाऱ्यांनी व्यवहार पूर्णत: बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.एनआरसी, सीएए व एनपीआर कायदा मागे घेण्यात यावा याप्रमुख मागणीसाठी बहुजन क्रांती मोर्चातर्फे भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शहरातील कॉँग्रेस, एमआयएम, महागठबंधन या प्रमुख राजकीय पक्षासह दस्तूर बचाव कमिटी, दस्तूर-ए-हिंद बचाव कमिटी व धार्मिक घटनांनी या बंदला पाठिंबा दर्शवत व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार, प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पूर्व भागातील व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवत बंदमध्ये सहभागी झाले होते. काही भागात काही प्रमाणात चहाचे हॉटेल, लहान व्यवसाय सुरू होते. मात्र सर्वच बंद असल्याची माहिती मिळताच त्यांनीही दुकाने बंद केल्याने शंभर टक्के बंद पाळला गेला. बंदमध्ये यंत्रमाग व्यवसाय, भाजीपाला बाजार, हॉटेल, दुकानदार सामील झाले होते.शहर कॉँग्रेसतर्फे शहरातील हजारखोली, गुलशेरनगर, आयेशानगर अशा विविध भागात कॉँग्रेसतर्फे महिलांचे धरणे आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व महापौर ताहेरा शेख करीत आहेत. सुन्नी तनजीमतर्फे जुना आग्रा रस्त्यावरील हुसेन कम्पाउण्डमध्ये मागील आठवडाभरापासून महिलांचे धरणे आंदोलन सुरू आहे.

टॅग्स :Strikeसंप