शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बॅँक विलीनीकरणाबाबत संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:56 IST

केंद्र सरकारने जाहीर केलेले १० बॅँकांचे विलीनीकरण हे फायद्याचे आहे, असे मत काहींनी व्यक्त केले तर ही कृती म्हणजे भांडवलशाही आणण्याचा घाट असल्याचीही प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे.

नाशिक : केंद्र सरकारने जाहीर केलेले १० बॅँकांचे विलीनीकरण हे फायद्याचे आहे, असे मत काहींनी व्यक्त केले तर ही कृती म्हणजे भांडवलशाही आणण्याचा घाट असल्याचीही प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे.केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील १० बॅँकांचे विलीनीकरण करून चार बॅँका निर्माण करण्याच्या जाहीर केलेल्या निर्णयावर बॅँकिंग क्षेत्रामध्ये याची संमिश्र प्रतिक्रिया उमटली असली तरी यामधून उद्योगांना अधिक फायदा होण्याची शक्यताही व्यक्त झाली आहे.देशामधील बॅँकिंग क्षेत्र उद्ध्वस्त करणारा हा निर्णय आहे. बॅँकांमधील वाढता एनपीए झाकण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना बॅँकेच्या सेवा मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होतील. कर्मचारी संघटनांनी या निर्णयाला यापूर्वीही विरोध केला आहे. यामुळे कर्मचारी कपात होण्याचा धोकाही आहे. याआधी आरबीआयचा निधी घेतला आणि बॅँकांवर आता गंडांतर येत आहे.- डॉ. डी. एल. कराड, कामगार नेतेसन २००८-०९ मध्ये आलेल्या जागतिक मंदीची झळ भारताला फारशी बसली नव्हती याचे श्रेय सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांना आहे; मात्र आता सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांनाच मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी सरकारने बॅँकांचे व्यवस्थापन, कर्मचारी संघटना यांना विश्वासात घेतलेले नाही. परिणामी कर्मचारी कपातीचे संकट उभे ठाकणार आहे. या निर्णयाविरोधात शनिवारी सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांचे सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून आपला निषेध व्यक्त करणार आहेत.- शिवा भामरे, उपमहासचिव,स्टेट बॅँक कर्मचारी युनियनदहा बँकांच्या विलीनीकरणाच्या या निर्णयामुळे कमकुवत बॅँकांना मजबूत बॅँकांचा आधार मिळणार आहे. यामुळे या बॅँकांकडून होणारा पतपुरवठा हा सुरळीत होऊ शकेल. तसेच त्यांचा एनपीए कमी होऊ शकेल. याआधी झालेल्या विलीनीकरणाचे सकारात्मक परिणाम दिसलेले नाहीत. सरकारच्या या प्रयत्नांना व्यवस्थापन आणि कर्मचारी यांनी साथ देऊन व्यवस्थित अंमलबजावणी करावी.- संतोष मंडलेचा, अध्यक्ष, महाराष्ट चेंबर आॅफ कॉमर्स

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारBanking Sectorबँकिंग क्षेत्र