शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

मनपा आयुक्तांकडून गटनेत्यांची मनधरणी

By admin | Updated: December 14, 2015 00:08 IST

सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक : आयुक्तांनी मांडली भूमिका, विरोधाचा सूर मात्र कायम; आज अंतिम निर्णय

नाशिक : सर्वपक्षीय गटनेत्यांनी एसपीव्हीला मान्यता देऊन तसा ठराव महासभेने करून द्यावा यासाठी मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्व गटनेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत मनधरणी नाट्य सुरू होते. १५ डिसेंबरपर्यंत शासनाला प्रस्ताव सादर करावयाचा असल्याने उद्या सोमवार दि. १४ रोजी गटनेते आपली भूमिका लेखी स्वरूपात आयुक्तांना सादर करणार असल्याचे समजते. नाशिकचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतल्यानंतर महापौरांनी महासभेच्या निर्णयात कोणताही बदल न करता ‘करवाढ’ आणि ‘एसपीव्ही’ (स्पेशल पर्पज व्हेइकल) वगळून प्रस्ताव प्रशासनाला रवाना केला आहे. ‘एसपीव्ही’वगळून प्रस्ताव प्रशासनाला पाठविण्यात आल्याने दुसऱ्या टप्प्यातील चॅलेंज स्पर्धेत नाशिकचा टिकाव लागण्याची शक्यता मावळली आहेच शिवाय १५ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव राज्य शासनाला सादर करावयाचा असल्याने ‘एसपीव्ही’ मंजुरीसाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. गेल्या २ डिसेंबर रोजी विशेष महासभेत स्मार्ट सिटीच्या प्रस्तावातील करवाढ आणि ‘एसपीव्ही’ला सदस्यांनी विरोध दर्शविला होता. भाजपाच्या सदस्यांनी केवळ करवाढीला विरोध दर्शवित ‘एसपीव्ही’बद्दल भूमिका स्पष्ट केलेली नव्हती. आजही त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी एसपीव्ही अर्थात कंपनीकरणामुळे महापालिकेच्या स्वायत्ततेवरच घाला येणार असल्याची भीती व्यक्त करत त्याला विरोध दर्शविला होता. त्यानंतर सभागृहानेही बग्गा यांच्या सुरात सूर मिसळून कंपनीकरणाचा प्रस्ताव झुगारून लावला होता.