शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

गणपती मंडळांचे देखावे पूर्णत्वास

By admin | Updated: September 9, 2016 01:19 IST

चलचित्रांना पसंती : धार्मिक, सामाजिक विषयांवर भर

नाशिक : शहरातील विविध गणपती मंडळांमध्ये गणरायांच्या आगमनानंतरही सुरू असलेले देखाव्यांचे काम पूर्णत्वास आले असून, काही मंडळांनी बुधवारी रात्री उशिरापर्यंत ते पूर्ण केले. शहरात दुपारच्या सुमारास परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडले असले तरी संध्याकाळी मात्र पावसाने उघडीप दिल्यानंतर विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी अखेरच्या टप्प्यातील देखावे, रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाईची कामे पूर्ण केली.गणेशोत्सव मंडळांनी यंदा धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर भर दिला असून, हिंदी-मराठी चित्रपटांतील पात्रांचाही देखाव्यांमध्ये समावेश केला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखावे, आरास व विद्युत रोषणाई विशेष कारागिरांकडून करून घेतली आहे. मेनरोड परिसरातील अनमोल मेनरोड मित्रमंडळाने केलेला जेजूरी गडाचा देखावा, रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाचा संत तुकाराम महाराजांचा भक्तीचा मेळा, टिळकपथ परिसरातील नामको बँकेच्या आवारात साईदरबाराचा देखावा यांसह यंदाच्या गणपती उत्सवात विविध मंडळांनी समाजप्रबोधनावरही भर देत स्त्रीभ्रूण हत्त्या, शहरातील वाढती गुन्हेगारी, पर्यावरण संवर्धन आदि विषयांवर देखावे तयार केले आहे. काही मंडळांनी शिवकालीन इतिहासाचे चलचित्र देखाव्यात साकारले आहे. जय मल्हार मालिकेसह रामायण, महाभारतातील चलचित्र देखाव्यांना भाविकांकडून पसंती मिळत आहे. यात संत ज्ञानेश्वर, राधा-कृष्ण, मीरा, सीता-राम आणि लक्ष्मण यांचा वनवास, पंढरीचे वारकरी आदि धार्मिक देखावे पाहण्यासाठी नाशिककर बाहेर पडत आहेत; मात्र दुपारच्या पावसाने गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडल्याने तुलनेत भाविकांची गर्दी कमी असली तरी शनिवारी व रविवारी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात निश्चितच पहायला मिळेल, अशी खात्री गणेश मंडळांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)