शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

निफाडला जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत ९९ कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:06 IST

निफाड : राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत निफाड तालुक्यातील ७ गावांत ९९ कामे पूर्ण झाली असून, ४० कामे प्रगतिपथावर आहेत.

ठळक मुद्देबंधारा दुरु स्तीच्या कामांमुळे वरील ७ गावातील सदर बंधाऱ्यात पाणी साठवण क्षमता वाढणार

निफाड : राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत निफाड तालुक्यातील ७ गावांत ९९ कामे पूर्ण झाली असून, ४० कामे प्रगतिपथावर आहेत.तालुक्यातील चितेगाव, गोरठाण, पिंपळगाव नजिक , टाकळी विंचूर, पाचोरे वणी, मरळगोई खुर्द, अंतरवेली या ७ गावांत तालुका कृषी अधिकारी कार्यालय , लघुपाटबंधारे जि. प. उपविभाग निफाड, पंचायत समिती, उपअभियंता लघुसिंचन, उपविभाग चांदवड, येवला सामाजिक वनीकरण विभाग, भूजल सर्वेक्षण यंत्रणा या सहा विभागांच्या वतीने ही कामे हाती घेण्यात आली आहेत. लोकसहभागातून काही कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा निफाडचे प्रांत महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरील सर्व विभागाने ही कामे पूर्ण केली आहेत. या ७ गावांत जलस्तर वाढविण्यासाठी नाला खोलीकरण, केटीवेअर बंधारा दुरुस्ती, विहीर पुनर्भरण, सीमेंट नाला बांधातील गाळ काढणे, सीमेंट बांध दुरु स्ती आदी कामे हाती घेण्यात आली होती शासनाच्या वरील विविध विभागाच्या वतीने या ७ गावात ७० कामे पूर्ण करण्यात आली असून ३९ कामे प्रगतीपथावर आहेत तर लोकसहभागातू २९ कामे पूर्ण करण्यात आली. १ काम प्रगतीपथावर आहे.लघुसिंचन विभागाच्या वतीने १३ कामे हाती घेण्यात आली होती. त्यातील ६ कामे पूर्ण झाली असून ७ कामे प्रगतिपथावर आहेत. लघुपाटबंधारे जि. प. उपविभाग निफाडच्या वतीने या तालुक्यात २३ कामे हाती घेण्यात आली होती. त्यातील १८ कामे पूर्ण झाली असून ५ कामे प्रगतिपथावर आहेत. बंधारा दुरु स्तीच्या कामांमुळे वरील ७ गावातील सदर बंधाऱ्यात पाणी साठवण क्षमता वाढणार असून त्याचा फायदा या गावांना होणार आहे.